घरक्रीडाNations League : निकोलो बारेलाचा गोल; इटलीचा हॉलंडवर विजय 

Nations League : निकोलो बारेलाचा गोल; इटलीचा हॉलंडवर विजय 

Subscribe

इटलीचा हा यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय ठरला.

निकोलो बारेलाने पूर्वार्धात केलेल्या गोलच्या जोरावर इटलीने युएफा नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात हॉलंडवर १-० असा विजय मिळवला. इटलीचा हा या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला. त्यामुळे इटलीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आपली मागील दोन वर्षे अपराजित राहण्याची मालिका सुरु ठेवली आहे. ‘आमच्या संपूर्ण संघानेच या सामन्यात अप्रतिम खेळ केला. आमच्यासाठी हा निकाल महत्त्वपूर्ण ठरला. या सामन्यातील कामगिरीने आम्ही खूप आनंदी आहोत,’ असे सामन्यानंतर इटलीचा खेळाडू लोरेंझो इनसिंये म्हणाला.

इटलीचा भक्कम बचाव

या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघाना गोल करता आला नाही. परंतु, ४५ मिनिटांनंतर वाढवण्यात आलेल्या अतिरिक्त वेळेत निकोलो बारेलाने हेडर मारून गोल केला आणि इटलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात हॉलंडचा संघ त्यांचा खेळ सुधारेल आणि सामन्यात पुनरागमन करेल असे अपेक्षित होते. मात्र, इटलीचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे इटलीने हा सामना १-० याच फरकाने जिंकला.

- Advertisement -

नॉर्वेची नॉर्दर्न आयर्लंडवर मात 

दुसरीकडे नॉर्वेने नॉर्दर्न आयर्लंडचा ५-१ असा धुव्वा उडवला. नॉर्वेकडून स्टार खेळाडू एर्लिंग हालेंडने दोन गोल केले. नॉर्वेचा हा दोन सामन्यांतील पहिला विजय ठरला. याच गटातील दुसऱ्या सामन्यात रोमेनियाने ऑस्ट्रियावर ३-२ अशी मात केली. रोमेनियाकडून अलीबेक, ग्रिगोर आणि मॅक्सिम यांनी गोल केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -