घरक्रीडाबुमराहच सर्वोत्तम!

बुमराहच सर्वोत्तम!

Subscribe

कर्णधार कोहलीची स्तुती

जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वात परिपूर्ण गोलंदाज आहे, अशा शब्दांत कर्णधार विराट कोहलीने भारताच्या वेगवान गोलंदाजाची स्तुती केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहने हॅटट्रिकसह ६ विकेट्स मिळवल्या. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो केवळ तिसरा भारतीय गोलंदाज आहे. या मालिकेदरम्यानच त्याने ५० कसोटी विकेट्सचा टप्पाही पार केला. गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे कसोटी क्रिकेटमध्ये बुमराह यशस्वी होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, त्याने बर्‍याच लोकांना चुकीचे ठरवले आहे, असे कोहलीला वाटते.

बुमराह चेंडूची दिशा, स्विंग आणि वेगाने फलंदाजांना अडचणीत टाकतो. माझ्या मते तो सध्याच्या घडीला जगातील सर्वात परिपूर्ण गोलंदाज आहे. बुमराह केवळ टी-२० क्रिकेटमध्येच चांगली कामगिरी करू शकतो असा लोकांचा समज होता. मात्र, त्याने एकदिवसीय क्रिकेट पाठोपाठ कसोटीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने बर्‍याच लोकांना चुकीचे ठरवले आहे. त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज व्हायचे आहे. तो त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. तो खूप सराव करतो आणि खाण्या-पिण्याची योग्य काळजी घेतो. त्याचे स्वतःवर खूप नियंत्रण आहे. बुमराह आमच्या संघात असणे हे आमचे भाग्य आहे, असे कोहली म्हणाला.

- Advertisement -

बुमराहची प्रगती वाखाणण्याजोगी -सचिन

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यानंतर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विटरवरून जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. भारतीय संघाचे कसोटी मालिका जिंकल्याबद्दल अभिनंदन. या मालिकेत जसप्रीत बुमराहने केलेली गोलंदाजी पाहून मजा आली. त्याने घेतलेली हॅटट्रिक खूप खास होती. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ज्या झपाट्याने प्रगती केली आहे, ते वाखाणण्याजोगे आहे, असे सचिनने ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -