घरक्रीडाकोहलीची लॉकडाऊनमध्येही इंस्टाग्रामवर कोट्यवधींची कमाई!

कोहलीची लॉकडाऊनमध्येही इंस्टाग्रामवर कोट्यवधींची कमाई!

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे जगभरातील विविध खेळांमधील खेळाडू सोशल मीडियावर बरेच अ‍ॅक्टिव्ह झाले होते. याचा काही खेळाडूंना बराच आर्थिक फायदा झाला असून त्यांनी कोट्यवधींची कमाई केली आहे. लॉकडाऊनच्या काळात इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणार्‍या अव्वल दहा खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही समावेश होता. या यादीत समाविष्ट असणारा कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आणि भारतीय खेळाडू होता.

‘अटेन’ या कंपनीने १२ मार्च ते १४ मे या कालावधीत इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणार्‍या अव्वल दहा खेळाडूंची यादी तयार केली. या यादीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू अव्वल स्थानी होता. त्याने या काळात इंस्टाग्रामवर १७ कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली, तर अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (११.४ कोटी) आणि ब्राझीलचा नेयमार (१०.५ कोटी) हे फुटबॉलपटू अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर होते.

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोहली या यादीत सहाव्या स्थानी होता. त्याने इंस्टाग्रामवर विविध ब्रँडच्या पोस्ट करत साधारण दोन महिन्यांच्या काळात ३.६ कोटींहूनही अधिकची कमाई केली. कोहलीचे इंस्टाग्रामवर ६२.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -