पंजाब स्ट्राईकर्सचा ‘लगोरी इंडीयन प्रिमीयर लीग’ मध्ये दिमाखदार विजय

lagori
लगोरी इंडीयन प्रिमीयर लीगच्या पुरस्कार सोहळ्यातील एक क्षण

लगोरी इंडीयन प्रिमीयर लीगचा दुसरा सीझन पनवेलमध्ये संपन्न

पनवेलमध्ये पार पडलेल्या लगोरी इंडियन प्रिमीयर लीगच्या अंतिम सामन्यात पंजाब स्ट्राईकर्सने रायगड टायगर्सला नमवत या स्पर्धेत विजय मिळवला आहे. महाराष्ट्र लगोरी असोसिएशनने आयोजन केलेल्या या स्पर्धेला २१ मे पासून सुरूवात झाली होती. पनवेलमधल्या कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात मिस इंडिया प्रतिभा सॉंशीमथ, अभिनेत्री मेलिस्सा अंद्राडे, मोनिका अंद्राडे यांच्या बरोबरीने एस.के. ग्रूपचे उद्योजक संजीव कुमार यांचा समावेश होता. संजीव कुमार यांनी मॅटवरची लगोरी फोडून या सामन्यांचं उद्घाटन केलं. यानंतर प्रतिभा सॉंशीमाथ, मेलिस्सा अंद्राडे आणि मोनिका अंद्राडे यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने सोहळ्याला चार-चाँद लावले.

अशी झाली लगोरी इंडीयन प्रिमीयर लीग

१० संघामध्ये झालेल्या या खेळात कर्नाटक वॉरीयर्स, पंजाब स्टाईकर्स, रायगड टायगर्स आणि पॉंडीचेरी हंटींग सीगल्स या संघानी सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. पहिली सेमी फायनल कर्नाटक वॉरीयर्स विरूद्ध पंजाब स्टाईकर्समध्ये झाली. ज्यामध्ये कर्नाटक वॉरीयर्सनं आपल्या दमदार खेळीनं पंजाब स्ट्राईकर्सना हरवलं. तर दुसरी सेमी फायनल रायगड टायगर्स आणि पॉंडीचेरी हंटींग सीगल्स मध्ये झाली. यात रायगड टायगर्सच्या यशस्वी चढाईच्या जोरावर पॉंडीचेरी हंटींग सीगल्सने आगेकूच केली. शेवटच्या क्षणांमध्ये पॉंडीचेरी हंटींग सीगल्सच्या आक्रमक चढाईच्या जोरावर रायगड टायगर्सने विजय साकारला. त्यानंतर झालेल्या अतिंम सामन्यात आक्रमण आणि बचाव अशा दोन्ही आघाड्यावर पंजाब स्टाईकर्सने रायगड टायगर्सला हारवत लगोरी इंडीयन प्रिमीयर लीगमध्ये विजयी मिळवला.

लवकरच लगोरीचा वर्ल्ड कप !!!

लगोरी इंडीयन प्रिमीयर लीगचा वर्ल्ड कप येत्या डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे महाराष्ट्र लगोरी असोसिएशनचे सचिव भरत गुरव यांनी जाहीर केले. यात जगभरातील संघ हजेरी लावणार आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here