घरक्रीडाराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप

राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप

Subscribe

लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणार्‍या पी.व्ही.सिंधूने सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये आपला पहिला सामना जिंकत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायना नेहवालने मात्र बॅडमिंटन कोर्टची परिस्थिती खराब खराब असल्याने आपला सामना खेळण्यास नकार दिला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करणे भाग पडले आहे.

माजी विजेत्या अव्वल सीडेड सिंधूने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नागपूरच्या मालविका बन्सोडचा २१-११, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूप्रमाणेच अश्मिता चलिहा, श्रीयांशी परदेशी, रिया मुकर्जी, आकर्षि कश्यप, नेहा पंडित आणि वैष्णवी भाले यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर कोर्ट खराब स्थितीत असल्याने दुखापत होण्याची शक्यता आहे असे सांगत सायनाने श्रुती मुंडादाविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला.

- Advertisement -

पुरुषांमध्ये अव्वल सीडेड समीर वर्माने अर्यमान टंडनविरुद्धच्या सामन्याच्या दुसर्‍या गेममध्ये दुखापतीमुळे अर्ध्यातून माघार घेतली. या सामन्याचा पहिला गेम समीरने २१-१६ असा जिंकला होता. अर्यमानसोबतच सौरभ वर्मा, लक्ष्य सेन, कौशल धर्ममेर, हर्षिल दाणी आणि बोधित जोशी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -