घरक्रीडापुरुषांत स्वस्तिक, महिलांत संघर्ष मंडळाला जेतेपद

पुरुषांत स्वस्तिक, महिलांत संघर्ष मंडळाला जेतेपद

Subscribe

स्वस्तिक क्रीडा मंडळाने पुरुषांमध्ये, तर संघर्ष क्रीडा मंडळाने महिलांमध्ये नव महाराष्ट्र मंडळ आयोजित ’आमदार चषक’ कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.पुरुषांमध्ये जॉली स्पोर्ट्सच्या अभिषेक नरला आणि महिलांमध्ये संघर्ष क्रीडा मंडळाच्या अश्विनी घाणेकरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. या दोघांनाही रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

गोराई येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर संपन्न झालेल्या प्रथम श्रेणी महिलांच्या अंतिम सामन्यात संघर्ष क्रीडा मंडळाने महात्मा गांधी स्पोर्ट्सचा २१-२० असा पराभव करत आमदार चषकावर आपले नाव कोरले. संघर्षने या सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्यांनी महात्मा गांधी संघावर पहिला लोण देत विश्रांतीला १४-७ अशी आघाडी घेतली. मात्र, उत्तरार्धात प्रतीक्षा मांडवकर, तृप्ती सोनावणे, ग्रंथाली हांडे या महात्मा गांधीच्या खेळाडूंनी आपल्या खेळात सुधारणा केली. शेवटची पाच मिनिटे पुकारली तेव्हा दोन्ही संघांमध्ये १८-१८ अशी बरोबरी होती. परंतु, अखेरच्या चढाईत अश्विनी कांबळेने एक गुण टिपत संघर्षला हा सामना २१-२० असा जिंकवून दिला.

- Advertisement -

प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सवर ३०-१७ अशी मात केली. स्वस्तिकने सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित करत मध्यंतराला २२-६ अशी भक्कम आघाडी मिळवली. त्यांनी पुढेही चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना १३ गुणांच्या फरकाने जिंकत या गटाचे विजेतेपद मिळवले. स्वस्तिकच्या विजयात आकाश उडेल, सुयोग राजापकर, अक्रम शेख या खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शंभूराजे क्रीडा मंडळ विजयी

- Advertisement -

व्दितीय श्रेणी पुरुषांमध्ये चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत शंभूराजे क्रीडा मंडळाने शिवतेज क्रीडा मंडळाला २६-२३ असे पराभूत करत आमदार चषक पटकावला. या सामन्याच्या मध्यंतराला १०-११ असे पिछाडीवर पडलेल्या शंभूराजे संघाने उत्तरार्धात दमदार पुनरागमन करत हा विजय साकारला. कृष्णा शेट्टीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -