घरक्रीडाउत्तेजक द्रव्य सेवन केल्यामुळे पृथ्वी शॉ ८ महिन्यांसाठी निलंबित

उत्तेजक द्रव्य सेवन केल्यामुळे पृथ्वी शॉ ८ महिन्यांसाठी निलंबित

Subscribe

रक्तात उत्तेजक द्रव्याचे घटक आढळल्यामुळे पृथ्वी शॉला बीसीसीआयने ८ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. कफ सिरफ घेत असताना त्यातून नकळत पृथ्वीच्या शरीरात उत्तेजक द्रव्य गेल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. मात्र, हे नियमांच्या बाहेर आहे. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान २२ फेब्रुवारी २०१९ रोजी इंदूरमध्ये पृथ्वी शॉने डोपिंग चाचणीसाठी सॅम्पल दिले होते. यात त्याने उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचे निषपन्न झाले आहे. हा पदार्थ वर्ल्ड अॅन्टी-डॉपिंग एजन्सीने (वाडा) बंदी घातलेल्या पदार्थांच्या यादीत मोडतो. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरु होता. दरम्यान, १६ जुलै रोजी पृथ्वीने याविषयावर स्पष्टीकरण दिले होते. कफ सिरफमार्फत ते द्राव्य शरीरात शिरले असल्याचे शॉ म्हणाला होता. बीसीसीआयने स्पष्टीकरण मान्य केले. परंतु, वाडा कायद्यामार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -