पंजाब आणि कोलकातामध्ये प्ले-ऑफसाठी टक्कर

आयपीएल स्पर्धा आता रंगतदार वळणावर पोहोचली असून मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, चौथ्या स्थानासाठी किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये स्पर्धा आहे. या दोन्ही संघांचे आतापर्यंत १२ सामन्यांत १२ गुण आहेत. नुकताच या दोन संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात पंजाबच्या संघाने बाजी मारली होती. हा त्यांचा सलग पाचवा विजय होता. त्यामुळे प्ले-ऑफ गाठण्यासाठी सध्या पंजाबचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, कोलकाताच्या संघातही बरेच मॅचविनर आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांचे उर्वरित दोन सामने चुरशीचे होऊ शकतील.