घरक्रीडामुंबई मॅरेथॉन 2019 साठीच्या नोंदणीला सुरुवात

मुंबई मॅरेथॉन 2019 साठीच्या नोंदणीला सुरुवात

Subscribe

मुंबई मॅरेथॉन २०१९ च्या नोंदणीला सुरुवात. ऑनलाईन नोंदणीसाठी https://tatamumbaimarathon.procamrunning.in या संकेतस्थळाला भेट द्यायला लागेल.

दरवर्षीप्रमाणे मुंबई मॅरेथॉनच्या २०१९ च्या नोंदणीची सुरुवात होणार आहे. मॅरेथॉनचं हे १६ वं वर्ष असून ही मॅरेथॉन २० जानेवारी, २०१९ ला होणार आहे. या सीझनमध्ये सहा वेगवेगळे गट असून ४६ हजार धावपटूंना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ४०५,००० डॉलर रक्कम असणारी ही स्पर्धा आयएएएफ सिल्वर लेबल स्पर्धा आहे. आशियातील आघाडीच्या या मॅरेथॉनला राज्याचे प्रथम नागरिक असलेले राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि टाटा सन्स व टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे टाटा मुंबई मॅरेथॉन 2019 च्या पूर्ण मॅरेथॉन गटाच्या नोंदणीस सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबई मॅरेथॉनचं १६ वं वर्ष

‘टाटा मुंबई मॅरेथॉन हे १६ वर्ष आपण साजरे करणार आहोत. या प्रवासामध्ये आम्ही प्रायोजक, पार्टनर्स, आपले राज्य, स्थानिक प्रशासन व आपले धावपटू यांचे योगदान महत्वाचे आहे. यामुळेच आम्ही जगातील अव्वल १० मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आहोत.’ असं प्रोकॅम इंटरनॅशनलचे संयुक्‍त व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

कशी असेल नोंदणी?

पूर्ण मॅरेथॉनच्या नोंदणीला रविवारी २९ जुलैला सात वाजता सुरुवात होणार असून ३० नोव्हेंबरच्या २०१८ सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. किंवा त्यापूर्वी जागा भरल्यास नोंदणी बंद करण्यात येईल. लोकप्रिय अर्धमॅरेथॉन स्पर्धेच्या नोंदणीला २ ऑगस्ट २०१८ रोजी सात वाजल्यापासून सुरुवात होईल तर, १७ ऑगस्ट २०१८ ला सात वाजेपर्यंत सुरु राहील आणि त्यापूर्वी जागा भरल्यास नोंदणी बंद करण्यात येईल. अनेकांना धावण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता यावर्षी १० किमी गटात सर्व अमॅच्युर धावपटूंसाठी ठेवण्यात आली आहे. यासाठी नोंदणीला सोमवारी २० ऑगस्ट २०१८ ला सात वाजता सुरु होणार असून शनिवारी ८ सप्टेंबर २०१८ ला सात वाजेपर्यंत सुरु राहील किंवा त्यापूर्वी जागा भरल्यास नोंदणी बंद करण्यात येईल. आपले टायमिंग सर्टिफिकेटची नोंद केल्यास त्यांना टायमिंगसाठी गृहीत धरले जाईल नाहीतर, त्यांची नोंद साधारण गटात केली जाईल.

ड्रीम रनची नोंदणी

ड्रीम रनच्या नोंदणीला सोमवारी २७ ऑगस्ट २०१८ ला सात वाजल्यापासून सुरुवात होईल.तर, ३१ ऑगस्ट २०१८ सात वाजता किवा त्यापूर्वी जागा भरल्यास बंद करण्यात येईल. सिनियर सिटिझन व चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटीसाठी नोंदणीला शनिवारी १ सप्टेंबरला सात वाजल्यापासून सुरुवात होईल आणि ८ सप्टेंबर २०१८ ला सात वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी जागा भरल्यास बंद करण्यात येईल.

- Advertisement -

कसा असेल महिलांचा सहभाग?

मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून नेहमीच महिलांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षाच्या प्रवासात अनेक चांगल्या धावपटू मिळाल्या आहेत. यावर्षी देखील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सर्व महिला धावपटूंसाठी ज्यांच्याकडे टायमिंग सर्टिफिकेट नाही आणि त्यांना सहभाग नोंदवायचा आहे, त्यांच्यासाठी काही जागा या निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन नोंदणीसाठी कसा भरावा अर्ज

ऑनलाईन नोंदणीसाठी https://tatamumbaimarathon.procamrunning.in या संकेतस्थळाला भेट द्यायला लागेल. या संदर्भातील अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच, https://tatamumbaimarathon.procamrunning.in या संकेतस्थळावरुन अर्ज घेता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -