घरक्रीडाविराट कोहलीचं 'हे' कर्णधारपद काढून घ्या

विराट कोहलीचं ‘हे’ कर्णधारपद काढून घ्या

Subscribe

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन यांचं मत

जगात असे अनेक संघ आहेत ज्यांचे दोन कर्णधार आहेत, यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देखील आहेत. भारतातही कधीकधी अशी चर्चा असते की कर्णधारपदाचा बोजा पाहता संघात दोन कर्णधार असावेत. टीम इंडियाच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये विराट कोहली कर्णधार आहे आणि त्याच्यावर कामाचा ताण खूपच आहे. अशा परिस्थितीत विराटवरचा ताण कमी करण्यासाठी रोहित शर्मालादेखील कोणत्याही एका फॉरमॅटचा कर्णधार बनवावं, असं काही क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन यांचा देखील असाच विचार आहे. स्पोर्ट्स वेबसाइटवर फेसबुक लाइव्ह दरम्यान ते म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने विराट कोहली आणि रोहित शर्मा यादोघांमध्ये कर्णधारपद द्यावं. अतुल म्हणाला की मला असं वाटतं की विराटवर प्रत्येक फॉर्मेटमध्ये कर्णधारपदाचा दबाव असतो.

- Advertisement -

विराट कोहली २०१४ मध्ये कसोटी संघाचा आणि २०१७ च्या सुरूवातीस एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार झाला. विराटच्या नेतृत्वात प्रत्येक फॉर्मेटमध्ये संघाची कामगिरी उत्कृष्ट आहे, पण भारताला कोणतंही मोठे यश मिळालेलं नाही. विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया कसोटीमध्ये ४३ महिने जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ होता. दुसरीकडे, जेव्हा जेव्हा भारताची कर्णधार होण्याची संधी मिळाली तेव्हा रोहित शर्माने संघासह चांगलं प्रदर्शन केलं. त्याच्या नेतृत्वात भारताने निदहास ट्रॉफी आणि २०१८ मध्ये एशिया कप जिंकला.


हेही वाचा – आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत अधिक स्पष्टता गरजेची – शाकिब

- Advertisement -

भारतातील दोन कर्णधारांच्या संकल्पनेविषयी बोलताना अतुलने विराटच्या नेतृत्वाचे कौतुक केले, तर रोहितच्या कर्णधारपदाच्या कौशल्याचीही प्रशंसा केली. अतुल म्हणाले की, दोन्ही कर्णधारांच्या रणनीतीवर भारताने विचार करायला हवा. विराटवर खूप दबाव आहे आणि त्याला प्रत्येक रूपात कर्णधार करण्याची इच्छा आहे, पण रोहितनेही तो एक उत्तम लीडर असल्याचं दाखवून दिलं आहे. अतुल म्हणाले की, रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले तर २०१३ मध्ये एकदा चॅम्पियन्स लीग टी-२० करंडकही जिंकला आहे. ते म्हणाला की कसोटीत कर्णधारपदी तो उत्कृष्ट आहे आणि एकदिवसीय सामन्यात तो एक महान कर्णधार आहे, रोहित शर्माला टी-२० संघाचा कर्णधारपद देण्यात आलं तर विराटवरचा दबाव कमी होईल.

रोहितचा विक्रम उत्कृष्ट असून तो समोर राहून संघाचं नेतृत्व करतो, असं वासन यांनी सांगितलं. त्यानेही मुंबई इंडियन्ससाठी असंच केलं आहे. विराटबद्दल ते म्हणाले की, विराट कसोटी क्रिकेटमधील बॉस आहे. एकदिवसीय सामन्यातही विराट कर्णधार असावा, पण टी २० क्रिकेटमध्ये विराटने दबाव कमी करण्यासाठी दुसऱ्याला अर्थात रोहित शर्मालाही कर्णधार करावं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -