घरताज्या घडामोडीजम्मू - काश्मीरमध्ये नागरिकांनी पकडले पाकिस्तानी 'गुप्तहेर कबूतर'

जम्मू – काश्मीरमध्ये नागरिकांनी पकडले पाकिस्तानी ‘गुप्तहेर कबूतर’

Subscribe

जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात नागरिकांनी पाकिस्तानी 'गुप्तहेर कबूतर' पकडले आहे. विशेष म्हणजे या कबूतराच्या पायात चक्क अंगठी आढळून आली असून या अंगठीवर एक क्रमांक लिहिण्यात आला होता.

जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात नागरिकांनी पाकिस्तानी ‘गुप्तहेर कबूतर’ पकडले आहे. विशेष म्हणजे या कबूतराच्या पायात चक्क अंगठी आढळून आली असून या अंगठीवर एक क्रमांक लिहिण्यात आला होता. नागरिकांनी या कबूतराला ताब्यात घेऊन आयबीने पकडले आहे, अशी माहिती सोमवारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पाकिस्तानच्या दिशेने उडत आलेल्या ‘कोडेड मेसेज’ असलेले कबूतर हिरामगर सेक्टरमधील मान्यारी गावच्या रहिवाशांनी ताब्यात घेऊन आयबीच्या ताब्यात दिले आहे. संबंधित सुरक्षा यंत्रणा ‘कोडेड मेसेज’ उलगडण्याचे काम करीत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

गावकऱ्यांनी रविवारी कबुतराला स्थानिक पोलिसांकडे सुपूर्द केले. त्या कबुतराच्या पायात अंगठी होती आणि त्या अंगठीवर एक कोड लिहिण्यात आला होता. याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत.  – शैलेंद्र मिश्रा; कठुआचे वरिष्ठ पोलीस अक्षीक्षक

कबुतराच्या पंखावर होता संदेश

गेल्या दोन महिन्यांपूर्वी अशाच एका कबुतराला ताब्यात घेण्यात आले होते. या पाकिस्तानी कबुतराला पोलिसांनी बीकानेर जिल्ह्यातील मोतीगड गावात पकडले होते. या कबुतराच्या पंखांवर उर्दूमध्ये संदेश लिहिण्यात आला होता. तसेच त्याच्या पायात देखील अंगठ्या आढळून आल्या होत्या. पोलिसांनी तसेच गुप्तचर यंत्रणेने कबुतराची चौकशी केली. पण, त्यादरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे पोलीस आणि गुप्तचर संस्था इतर कामांमध्ये व्यस्त झाली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा कबूतर पकडण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊन नाही, जास्त टेस्टींग नाही, तरीही कोरोनावर जपानने विजय कसा मिळविला?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -