घरक्रीडाविराट कोहली अप्रगल्भ

विराट कोहली अप्रगल्भ

Subscribe

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ यजमान इंग्लंडकडून पराभूत झाला. ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासोबत सामना खेळणार आहे. मात्र या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडाने विराट कोहली अप्रगल्भ खेळाडू असल्याची टीका केली आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रबाडाने ही टीका केली आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यातील एका प्रसंगाचा दाखला देत, ज्यावेळी विराटने मला चौकार लगावला, तेव्हा तो माझ्याकडे पाहून पुटपुटला. मात्र नंतर मी त्याला चकवले हे त्याला आवडले नाही, या वागण्याचा अर्थच मला समजला नाही. माझ्यासाठी त्याचे हे वागणे अत्यंत अप्रगल्भ होते,असे रबाडाने म्हटले आहे.

- Advertisement -

स्पर्धेआधी खेळवण्यात आलेल्या दोन सराव सामन्यांमध्ये भारताने एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्विकारला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार्‍या सामन्यात जलदगती गोलंदाजांचा सामना करण्याचं मोठे आव्हान भारतासमोर असणार आहे. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -