अभिजित नायर ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू

व्हीपीएम क्लबचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

Mumbai
सोना धिंग्रा (मुख्याध्यापिका -चिल्ड्रन अकादमी, कांदिवली) यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रीय खेळाडू शिवबा नारकर.

महाराष्ट्राच्या अ‍ॅथलेटिक्समध्ये महत्त्वाचे योगदान देणार्‍या दहिसरच्या व्ही. पी. एम स्पोर्ट्स क्लबचा ३० वा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात २०१९-२० मोसमात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके मिळवणार्‍या खेळाडूंचा रोख पारितोषिक व चषक देऊन गौरव करण्यात आला. मुलांमध्ये अभिजित नायर आणि मुलींमध्ये श्रावणी माळी यांनी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने एन. एल. कॉलेज, मालाडच्या मुख्याध्यापिका अ‍ॅनसी जोस यांचा व्हीपीएम भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच खेळाडूंनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. २०१९-२० मोसमात व्हीपीएम क्लबच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांत मिळून १५१ सुवर्ण, ११० रौप्य आणि ९२ कांस्य अशी एकूण ३५३ पदके जिंकली.