घरक्रीडादंगल गर्लने दिली गुड न्यूज!

दंगल गर्लने दिली गुड न्यूज!

Subscribe

दंगल गर्ल म्हणून सुप्रसिद्ध असणारी भारताची महिला कुस्तीपटू गीता फोगट हिच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. लवकरच ती आई बनणार आहे. ही गुड न्यूज तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून दिली आहे. २०१० राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी कुस्तीच्या स्पर्धेमध्ये गीताने सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच तिने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुर्वणपदके जिंकली आहेत. गीताने प्रेग्नन्सींचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना असं लिहिलं आहे की, ‘जेव्हा नवीन जीवन तुमच्यात येते तेव्हा आई होण्याचा आनंद तुम्हाला होतो. जेव्हा त्या चिमुकल्या जीवाची धडधड आणि पोटात खेळातानाची ती किक कधी एकटी नसल्याची आठवण करून देते. जोपर्यंत हे तुम्हाला जाणवत नाही तोपर्यंत तुम्हा आयुष्याचा अर्थ नीटपणे कळत नाही.’

- Advertisement -

नोव्हेंबर २०१६ मध्ये गीता कुस्तीपटू पवन कुमारशी विवाहबंधनात अडकली होती. गीताच्या आयुष्यावर आधारलेला दंगल चित्रपट हा खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटामध्ये गीताची भूमिका ही फातिमा सना शेखने केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर गीता देखील लोकप्रिय झाली. यानंतर तिने खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला.

डिसेंबर २०१७ मध्ये राष्ट्रकुल कुस्तीत स्पर्धेत गीताने एक सुवर्णपदक जिंकले होते. परंतु ५७ किलो वजनगटामध्ये पूजा धांडाकडून पराभूत झाल्यानंतर सीडब्ल्यूजी २०१८ मध्ये पात्र ठरण्यास ती अपयशी ठरली.

- Advertisement -

एप्रिलमध्ये मंगोलियाच्या उलानबेटोर येथे झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय कुस्ती संघात सहभाग न घेतल्यामुळे गीताने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी गमावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -