यशस्वीला मिळाली क्रिकेटच्या देवाची ‘भेट’!

पैशाची चणचण भागवण्यासाठी आझाद मैदानात पाणी पुरी आणि फळे विकणाऱ्या १७ वर्षीय यशस्वीची भारताच्या अंडर १९ संघात निवड.

Mumbai
sachin meet yashaswi
यशस्वी आणि सचिनची भेट

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पाणीपुरी विकून दिवस काढणाऱ्या यशस्वी जयस्वालची अखेर भारताच्या अंडर १९ संघात निवड झाल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. १७ वर्षांच्या यशस्वी जयस्वालला अखेर त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले असून सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशावेळी त्याची क्रिकेट जगतातील देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने भेट घेतल्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाहीये.

पाणीपुरीवाला भारताच्या अंडर १९ संघात

मूळचा उत्तर प्रदेशमधील भदोही गावचा असलेला यशस्वी जयस्वाल क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यााठी मुंबईत आला. वडील भदोहीत एक छोटेसे दुकान चालवत असताना आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशस्वी मुंबईत वरळीत त्याचे काका संतोष यांच्या घरी राहायला आला. घर छोटे असल्याने यशस्वीला अक्षरश: डेअरीत देखील झोपायला लागायचे. अशा परिस्थितीत पैशाची चणचण भागवण्यासाठी यशस्वी आझाद मैदानात रामलीला दरम्यान पाणी पुरी आणि फळे विकू लागला. याचवेळी त्याने आपल्या खेळावर देखील मेहनत घेतली. अशा प्रकारे ऑनफिल्ड आणि ऑफफिल्ड प्रचंड मेहनत करून यशस्वीने अखेर भारताच्या अंडर १९ संघात प्रवेश मिळवला.

yashswi jaiswal
यशस्वी जयस्वाल

यशस्वी आणि सचिनची भेट!

सचिन तेंडुलकरला जेव्हा यशस्वीबद्दल समजले तेव्हा त्याने आपला मुलगा अर्जुनला सांगून यशस्वीला घरी भेटण्यासाठी बोलावून घेतले. विशेष म्हणजे सचिनने केवळ त्याला भेटायलाच बोलावले नाही, तर त्याने यशस्वीला बॅटवर शुभेच्छांसह सही दिली. त्याचसोबत बॅटिंगबद्दल काही उपदेश देखील सचिनने यशस्वीला दिले. सचिनने यशस्वीला मोठ्या सामन्यांदरम्यान आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा? तसेच सामन्याच्या प्रेशरला बळी न पडता आपल्या परफॉर्मन्सवर लक्ष कसे द्यायचे? यावर काही सल्ले दिले.

yashaswi sachin bat
सचिनने दिली यशस्वीला बॅट भेट

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here