घरटेक-वेकज्येष्ठ नागरिकांसाठी iBall चा 'Aasaan 4'

ज्येष्ठ नागरिकांसाठी iBall चा ‘Aasaan 4’

Subscribe

iBall च्या Aasaan 4 या स्मार्टफोनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा पुरेपुर विचार करण्यात आला आहे. यादृष्टीने फोनमध्ये खास फिचर्सही देण्यात आली आहेत.

आजच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये बहुतांशी घरातील ज्येष्ठ नागरिकसुद्धा हमखास स्मार्टफोन वापरताना दिसतात. सहसा दिवसभर घरात एकटे राहणारे वृद्ध घरातल्यांशी संपर्कात राहण्यासाठी हमखास फोनचा वापर करतात. हीच गरज ओळखून iBall कंपनीने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी Aasaan 4 हा मोबाईल लाँच केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार क्लिअर डिस्प्ले, मोठ्या आकाराचं कीपॅड, स्पष्ट आणि मोठा आवाज आणि मोठा फाँट या वैशिष्ट्यांमुळे Aasaan 4 हा मोबाईल ज्येष्ठ नागरिकांच्या वापरासाठी योग्य फोन आहे. याशिवाय फोनमध्ये ज्येष्ठ नागिरकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, इमरंजसी अलर्ट सपोर्ट आणि मोबाईल ट्रॅकिगं सारख्या फिचर्सचाही समावेश करण्यात आला आहे. जाणून घेऊया Aasaan 4 मोबाईलच्या अन्य फिचर्सविषयी…

Aasaan 4 चे फिचर्स :

  • या फोनमध्ये ड्युएल सीम कार्डची सोय
  • फोनला २.३१ इंचाचा डिस्प्ले
  • Braille कीपॅडची सोय. ज्याद्वारे नंबर आणि अक्षरं टाईप करणं सोपं
  • कीपॅडमध्ये व्हॉईस फिचरची सुविधा. त्यामुळे कीपॅडवर एखादा नंबर प्रेस केल्यानंतर तो ऐकूही येणार
  • इंटरनल स्टोरेज ३२ जीबी, एस डी कार्डद्वारे करु शकता एक्सपांड
  • १८०० एमएच क्षमतेची बॅटरी
  • २०० Sms आणि १०० Contacts सेव्ह करण्याची क्षमता

सुरक्षेची खास फिचर्स

या फोनमध्ये खास इमरजन्सी कॉलची सुविधा देण्यात आली आहे. अडचणीच्या काळात युजर्स मोबईल कीपॅडवरील SOS (Save our Souls) बटण दाबून आपल्या प्रियजनांना कॉल करु शकतात. याशिवाय मोबाईल ट्रॅकिंग फिचरचा वापर करुन तुम्ही अडचणीच्यावेळी युजर्स कुठे आहेत याचा अंदाज घेऊ शकता. याशिवाय फोनमध्ये पॉवरफुल एलईडी टॉर्च, लॉक करण्यासाठी टच बटन आणि वायरलेस एफएम सारख्या फिचर्सचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या देशभरात हा फोन व्हाईट कलरमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत ३ हजार ९९९ इतकी किंमत आहे. त्यामुळे हा फोन सर्वसामान्यांना परवडणारा असल्याचं iBall कंपनीचं म्हणणं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -