घरटेक-वेकApple ऑनलाइन स्टोअर लाँच; कमी किंमतीत खरेदी करता येणार आयफोन

Apple ऑनलाइन स्टोअर लाँच; कमी किंमतीत खरेदी करता येणार आयफोन

Subscribe

Apple चे ऑनलाइन स्टोअर (Apple Online Store) आज २३ सप्टेंबरला भारतात लाँच करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत iPhone, Mac बुक, iPad यासह Apple चे डिव्हाइस खरेदी करण्यासाठी आपल्याला यापुढे ई-कॉमर्स साइट Amazon, फ्लिपकार्ट किंवा अधिकृत विक्रेत्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. लोकांना Apple स्टोअर वरून थेट डिव्हाइस खरेदी करता येणार आहे. Apple ऑनलाइन स्टोअरमुळे सवलतीच्या दरात Apple ची उत्पादने खरेदी करता येणार आहेत. बुकिंग केल्यानंतर २४ ते ७२ तासांच्या आत डिलिव्हरी करण्यात येईल, असा दावा कंपनीने केला आहे. डिलिव्हरी पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.

Apple स्टोअरमुळे ग्राहकांना बरेच फायदे मिळतील. विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात सर्व डिव्हाइस मिळणार आहेत. यासह विस्तारित वॉरंटीचा पर्याय उपलब्ध असेल. पेमेंट करण्यासाठी एकहून अधिक पर्याय असणार आहेत. शिवाय कंपनीकडून trade-in values ऑफर म्हणजेच एक्सचेंज ऑफर दिली जाणार आहे. तुमच्या जुन्या फोनची स्थिती, मॅन्युफॅक्चरिंग वर्ष, कॉन्फिगरेशननुसार नव्या फोनवर सूट देण्यात येईल. ही ऑफर सर्व फोनसाठी नसणार आहे.

- Advertisement -

trade-in values ऑफर

कंपनीच्या वतीने iphone XS Max वर कमाल ३५,००० रुपये, iPhone XS वर ३४,००० रुपये, iPhone XR वर २४,००० रुपये, iphone X वर २८,००० रुपये, iphone 8 Plus वर २१,००० रुपये, iphone 8 वर १७,००० आणि 7 Plus वर १२,००० रुपये एवढी trade-in values ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय iphone 6s Plus वर ९ हजार रुपये, iphone 6s वर ,000,००० रुपये, आयफोन plus प्लसवर ८,००० रुपये, iphone SE वर ५००० रुपये एवढी trade-in values ऑफर देण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -