Flipkart वर ७० हजारांचा फोन मिळणार १९,९९९ रुपयांत; या तारखेपासून सेलला सुरुवात

देशातील Amazon आणि Flipkart पुन्हा एकदा फेस्टिव्ह सेल्स घेऊन येत आहेत. Amazon आणि Flipkart ने सेल्सच्या ऑफर्स आणि तारीख जाहीर केली आहे. फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज सेल’ १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टने अनेक ऑफर्स दिल्या आहेत. स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये दोन डिस्प्ले असलेला LG G8x ThinQ ग्राहकांना केवळ १९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. या फोनची मुळ किंमत ७० हजार रुपये आहे. LG ने गेल्यावर्षी दोन डिस्प्ले असलेला LG G8x ThinQ लाँच केला. हा फोन ड्यअल स्क्रिनमध्ये बदलतो. ल्टिटास्किंगसाठी हा फोन बेस्ट आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान या फोनवर ७० टक्के डिस्काउंट मिळणार आहे.

दमदार डिस्काउंट

या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात ऑफर्स आहेत. ‘Crazy Deals’ सेक्शनमध्ये LG G8x ThinQ वर मोठी सूट दिली जात आहे. लिस्टेड किंमत ७० हजार दिसत असून सध्या हा फोन फ्लिपकार्टवर ५४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. मात्र, फ्लिपकार्टच्या सेल दरम्यान या फोनवर आणखी ३५ हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसंच SBI डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्टवरून पेमेंट केल्यावर १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजेच हा फोन १७ हजार ९९१ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.