घरटेक-वेकमोबाईल आणि लँडलाईन कॉल करण्यापूर्वी 'शून्य' क्रमांक डायल करावा लागणार

मोबाईल आणि लँडलाईन कॉल करण्यापूर्वी ‘शून्य’ क्रमांक डायल करावा लागणार

Subscribe

फोन वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय दूरसंचार नियामक मंडळाचा अर्थात ‘ट्राय’च्या आदेशानुसार नव्या वर्षांच्या सुरुवातील १ जानेवारीपासून मोबाईल आणि लँडलाईनच्या क्रमांकात बदल होणार आहेत. फोन क्रमांकाच्या आधी ‘शून्य’ क्रमांक डायल करण्याच्या प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून मोबाईल असो किंवा लँडलाईन असो फोन करताना आधी ‘शून्य’ क्रमांका डायल करावा लागणार आहे.

भविष्यात मोबाईल नंबरचा आकडा वाढवावा लागू शकतो. जो १० नंबरचा मोबाईल क्रमांक असतो तो ११ किंवा त्यापेक्षा जास्त करावा लागू शकतो, अशी जी शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन पूर्वनियोजनाचा भाग म्हणून ट्रायने हे पाऊल उचलले आहे. ट्रायने जो दूरसंचार विभागाकडे प्रस्ताव दिला होता की, मोबाईल क्रमांच्या आधी एक आकडा वाढवायचा, त्यातही तो शून्य असावा. असा प्रस्ताव २० नोव्हेंबरला मंजूर झालेला आहे. तसेच याचे परिपत्रक निघाले आहे. १ जानेवारीपासून केलेला हा महत्त्वाचा बदल अंमलात येणार आहे.

- Advertisement -

यापूर्वी लँडलाईन नंबरच्या आधी २ हा क्रमांक लावण्याचा आदेश लागू झाला होता. या आदेशामुळे मोठ्या संख्येने लँडलाईनसाठी नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध झाले होते. पण आता लँडलाईन आणि मोबाईलवर कॉल करण्यापूर्वी ‘शून्य’ क्रमांका डायल करावा लागेल. समजा एखाद्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक १२३४५६७८९९ असा असेल तर त्यांना १ जानेवारीपासून ०१२३४५६७८९९ असा क्रमांका लावाव लागेल.


हेही वाचा –  भारतात 26 नोव्हेंबरला Nokia 2.4 आणि Nokia 3.4 होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -