घरटेक-वेकहायरने आणला सडपातळ एचआरएफ-६१६ रेफ्रिजरेटर

हायरने आणला सडपातळ एचआरएफ-६१६ रेफ्रिजरेटर

Subscribe

हायर कंपनीने सडपातळ असा एचआरएफ-६१९केएस ब्लॅक स्टील एडिशन रेफ्रिजरेटर लाँच केला आहे. या नवीन सडपातळ अशा रेफ्रिजरेटरची खोली ही ३५५ मिलीमीटर असून, यात आधुनिक फिचर आहेत. स्मूथ टच ग्लास डिजिटल कंट्रोल पॅनल, हॉलिडे आणि स्मार्टफंक्शन्स आहेत. यामुळे घरांतील व्यक्ती सुट्टीवर गेले तरीही यातील तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होते. यामध्ये फ्रिझरचा कप्पा नेहमीसारखा राहतो तसेच दुसर्‍या विभागातील तापमान हे १७ अंश सेल्शिअस टिकून राहते. परिणामी अधिक काळ बंद राहील्या तरी दुर्गंधी येत नाही.

किचनमधील जागा लक्षात घेऊन हायरने ९० अंशातील वक्राकार काऊंटर दरवाजा असल्याने दरवाजा संपूर्ण न उघडता आतील वस्तू काढणे शक्य होते. एचआरएफ-६१९ केएस ब्लॅक स्टील एडिशनमध्ये योग्य प्रमाणात साठवण्याची क्षमता असून, योग्यप्रमाणात रेफ्रिजरेटर आणि फ्रिझर उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच संपूर्ण क्षमतेच्या ६६ टक्के रेफ्रिजरेटर व ३४ टक्क फ्रिझर असे हे प्रमाण असल्याने वापरकर्त्यांना सर्वाधिक सोपेपणा मिळतो. या नवीन रेफ्रिजरेटरच्या काळ्या रंगामुळे तसेच अनोख्या शाही टेक्स्चर आणि स्टाईलमुळे तो आकर्षक दिसतो.

- Advertisement -

नवीन एचआरएफ-६१९केएस रेफ्रिजरेटर मध्ये सुपर कूल आणि फ्रिज असे दोन पर्याय आहेत. यातील स्मार्ट फंक्शनमध्ये आत कोणत्या वस्तू आहेत, त्यानुसार तसेच अन्य घटकांनुसार आतील तापमान बदलते. या रेफ्रिजरेटरची किमत १ लाख ५ हजार रुपये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -