iPhone 12, Pro आणि Pro Max लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत आणि फीचर्स

भारतातील आयफोन प्रेमींना कधी iPhone 12 खरेदी करता येणार?

बहुप्रतिक्षित iPhone 12 लाँच झाला आहे. Apple ने iPhone 12 चे चार मॉडेल्स लाँच केले आहेत. यात iPhone 12 mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max चा समावेश आहे. कोरोनामुळे आयफोन लाँचिंग कार्यक्रमाला उशिर झाला. पहिल्यांदाच आयफेनचा लाँचिंगचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पडला. सर्वात स्लिम 5G फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. भारतातील आयफोन प्रमींना ३० ऑक्टोबरला हा iPhone खरेदी करता येणार आहे.

iPhone 12 आणि iPhone 12 mini 64GB, 128GB आणि 256GB मॉडेलमध्ये आहे. भारतीय बाजारात iPhone 12 ची किंमत ७९,९०० पासून सुरू होते तर iPhone 12 mini ची प्रारंभिक किंमत ६९,९०० आहे. तर iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max 128GB, 256GB आणि 512GB या व्हेरिएंटमध्ये मिळणार आहेत. iPhone 12 Pro ची सुरुवातीची किंमत १ लाख १९ हजार रुपये आहे. तर iPhone 12 Pro Max ची किंमत १ लाख २९ हजार रुपयांपासून सुरु होते.

iPhone 12 स्पेसिफिकेशन

iPhone 12 मध्ये OLED डिस्प्ले देण्यात आला असून 5G सपोर्ट आहे. सर्व स्मार्टफोनमध्ये iOS 14 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आला आहे. त्यासह A14 Bionic SoC प्रोसेसर आहे. iPhone 12 मध्ये दोन 12MP चे वाइड अँगल सेन्सर दिले आहेत. Apple ने iPhone मध्ये नवीन MagSafe वायरलेस चार्जिंग स्टँडर्डदेखील दिला आहे. 15W पर्यंत वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

iPhone 12 mini स्पेसिफिकेशन

iPhone 12 mini मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले, सुपर रेटिना XDR डिस्प्ले, A14 Bionic SoC प्रोसेसर, 5G सपोर्ट आहे. Apple ने म्हटलं आहे की iPhone 12 आणि 12 mini मध्ये फक्त आकाराचा फरक आहे. iPhone 12 mini 7.7 इंचाच्या iPhone 7 पेक्षा लहान आणि हलका आहे. यामध्ये एक मोठा आणि चांगला डिस्पले देण्यात आला आहे. iPhone 12 आणि iPhone 12 mini निळा, हिरवा, काळा, पांढरा आणि लाल रंगात उपलब्ध आहे.

iPhone 12 Pro स्पेसिफिकेशन

iPhone 12 Pro मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे तर iPhone 12 Pro Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. iPhone 12 Pro मध्ये दोन वाइड अँगल सेन्सर आणि टेलिफोटो लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

iPhone 12 Pro Max मध्ये एक चांगला कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये टेलिफोटो कॅमेर्‍याद्वारे 2.5x ऑप्टिकल झूम करता येतं. यात एक चांगला अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देखील आहे. iPhone 12 Pro सीरिज एचडीआर व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि Dolby Vision HDR सपोर्ट देण्यात आला आहे.

iPhone 12 Pro आणि iPhone Pro Max ग्रेफाइट, सिल्व्हर, गोल्ड आणि पॅशनेट ब्लू अशा ४ रंगाच्या स्टेनलेस स्टील बॉडीत उपलब्ध आहे. आयफोन १२ प्रीमियम साहित्यासह डिझाइन करण्यात आला आहे. फोनच्या सुरक्षेसाठी स्टेनलेस स्टीलसहमजबूत ग्लासचा वापर करण्यात आला आहे. iPhone 12 Pro ३० मिनिटांपर्यंत ६ मीटर खोल पाण्यातही टिकू शकतो.