घरटेक-वेक'स्नॅपचॅट' प्रेमींसाठी नवीन व्हर्जन!

‘स्नॅपचॅट’ प्रेमींसाठी नवीन व्हर्जन!

Subscribe

या नवीन व्हर्जनमध्ये युजर्ससाठी नव्या फॉंट्सचा तसंच वेगवेगळ्या नवीन इमोजीसचा समावेश करण्यात आला आहे.

तरुणवर्ग मोठ्याप्रमाणावर वापरत असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी एक म्हणजे ‘स्नॅपचॅट’. जगभरातील करोडो लोक स्नॅपचॅट या सोशल मीडिया अॅपचा वापर करतात. दरम्यान स्नॅपचॅटने आपल्या युजर्ससाठी नुकतीच एक खुशखबर दिली आहे. लवकरच ‘स्नॅपचॅट’ एक नवीन व्हर्जन लाँच होणार आहे. हे व्हर्जन खास अँड्रॉईड युजर्ससाठी डेव्हलप करण्यात आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार स्नॅपचॅटच्या सध्या प्रचलित असलेल्या अँड्रॉईड व्हर्जनचं हे रिडिझाईन आणि आधुनिक व्हर्जन असेल. दरम्यान सध्या त्याचं परिक्षण सुरु असून येत्या काही काळात नवीन व्हर्जन लाँच केले जाईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तुम्हीही जर अँड्रॉईड युजर असाल आणि स्नॅपचॅट वापरत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. जाणून घेऊया, स्नॅपचॅटच्या या नवीन व्हर्जनमध्ये कोणत्या नवीन गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे ते…
snapchat new version

स्नॅपचॅटच्या नवीन व्हर्जनची खासियत

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार स्नॅपचॅटच्या या अपडेटेड व्हर्जनमध्ये अल्फाव्हर्जनचा वापर करण्यात आला आहे. जुन्या व्हर्जनच्या तुलनेत या व्हर्जनमध्ये अतिरिक्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. उदाहरणार्थ या नवीन व्हर्जनमध्ये युजर्ससाठी नव्या फॉंट्सचा तसंच वेगवेगळ्या नवीन इमोजीसचा समावेश करण्यात आला आहे. तसंच वेगवेगळ्या ‘इमोजी ब्रश’चा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सध्याचं व्हर्जन वापरताना अँड्रॉईड युजर्सना येणाऱ्या तांत्रिक अडचणी (बग्स), नव्या व्हर्जनमधून काढून टाकण्यात येणार असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. थोडक्यात स्नॅपचॅटचं हे नवीन अँड्रॉईड व्हर्जन युजर्ससाठी फायदेशीर ठरणार असल्याचं, कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -