घरटेक-वेकस्वस्तात खरेदी करता येणार iPhone XR; ग्राहकांना मिळणार १०% सूट

स्वस्तात खरेदी करता येणार iPhone XR; ग्राहकांना मिळणार १०% सूट

Subscribe

येत्या शुक्रवारपासून अॅपलचे अधिकृत पार्टनर आयफोन एक्स आर या फोनची कमी किंमतीत विक्री करण्यास सुरूवात केली आहे.

जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आयफोन ग्राहकांकरिता एक आनंदाची बातमी आहे. येत्या शुक्रवारपासून अॅपलचे अधिकृत पार्टनर आयफोन एक्स आर या फोनची कमी किंमतीत विक्री करण्यास सुरूवात केली आहे. या आयफोन किंमतीच्या डिस्काऊंट नंतर ५९ हजार ९०० रूपये किंमतीत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. भारतात स्मार्ट फोनची किंमत ७६ हजार ९०० रूपये इतकी आहे.

याशिवाय एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड होल्डर्संना १०% अधिक कॅशबॅक मिळणार आहे. हा कॅशबॅक मिळाल्यानंतर त्याच फोनची किंमत ५३ हजार ९०० होऊन ग्राहकांना अधिक फायदा मिळेल. या किंमतीत ६४ जीबी स्टोरेजचा आयफोन मिळणार आहे. आयफोन १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरोज असणाऱ्या फोनवर सवलत देखील उपलब्ध आहे. आयफोन एक्स आर १२८ जीबी वेरिएंट असणारा आयफोन ५८ हजार ४०० किंमतीत मिळणार आहे. एचडीएफसीचे ग्राहक नसल्यास १२८ जीबी स्टोरोज असणारा फोन ६४ हजार ९०० रूपये तर २५६ जीबी स्टोरेज असणारा फोन ७४ हजार रूपयास विकत घेता येईल.

- Advertisement -

या दोन्ही प्रकारचा स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत ८१ हजार ९०० आणि ९१ हजार ९०० रूपये इतकी आहे. या भारतातील आयफोनच्या सवलतीनंतर अमेरिकेतील बाजारपेठेतील आयफोनच्या किंमतीत समानता आली आहे. आयफोन एक्सआरची किंमत कमी करून अप्पल भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्याच्या तयारीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -