Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक नवीन वर्षांत स्मार्ट फोन मधून व्हॉट्स App होणार गायब

नवीन वर्षांत स्मार्ट फोन मधून व्हॉट्स App होणार गायब

देशात २५ हजारांहून अधिक युझर्स हे जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या फोनमध्ये व्हॉट्स App वापरत आहेत. त्यामुळे जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये जुन्या अपडेटेड सिस्टिमवर चालत असेल तर त्यात व्हॉट्स App वापरता येणार नाही.

Related Story

- Advertisement -

व्हॉट्स App नेहमीच त्यांच्या यझर्ससाठी नवीन फिचर्स आणत असते. व्हॉट्स Appशिवाय आता आपल्या दैनंदिन जिवनाचा भाग झाला आहे. मात्र नवीन वर्षात व्हॉट्स App स्मार्टफोनमधून बंद होणार आहे. आपल्याकडे आजही अनेक व्हॉट्स App आयफोन आणि स्मार्टफोनच्या जुन्या वर्जनमध्ये वापरले जाते. त्यामुळे आता व्हॉट्स App जुन्या आयफोन आणि स्मार्टफोनच्या जुन्या वर्जनमधून कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात २५ हजारांहून अधिक युझर्स हे जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या फोनमध्ये व्हॉट्स App वापरत आहेत. त्यामुळे जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये जुन्या अपडेटेड सिस्टिमवर चालत असेल तर त्यात व्हॉट्स App वापरता येणार नाही.

२०११मध्ये अँड्रॉइड वर्जन ४.०.३ लाँच झाले होते. त्या वर्जनला आयस्क्रिम सॅन्डविच असे नाव दिले होते. त्यावेळी स्मार्टफोनची नुकतीच सुरूवात झाली होती. Apple, सॅमसंग, एचटीसी त्याचबरोबर मायक्रोमॅक्स आणि लावा या स्वदेशी कंपन्यांचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जात होते. आजही अनेक जण तेव्हा खरेदी केलेले फोन वापरत आहेत. तर बऱ्याच जणांनी कमी किंमतीमध्ये जुने ओएस असलेले आयफोन विकल घेतले होते. मोबाईल विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सात हजार लोकांनी Applyचे जुने फोन विकत घेतले आहेत. ३१ डिसेंबर नंतर या फोनमधील व्हॉट्स App सुविधा बंद होणार आहे.

- Advertisement -

अँड्रॉइड काय असते?

अँड्रॉइड ही एक ऑपरेटिंग सिस्टिम आहे जी मोबाईल डिव्हाइस सुरू ठेवते. याला OS असेही म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टिम ही डिव्हाइसच्या हार्डवेअरवर लोड केलेली असते. मोबाईलची कार्यक्षमता आणि वैशिष्टये ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अवलंबून असते.

- Advertisement -

आईओएस काय आहे?

आयओएस ही एक सुद्धा एक ऑपरेटींग सिस्टिम आहे जी Apple आयफोन किंवा आयपॅडवर काम करते. याची सुरूवात २००७साली ओएस एक्स ऑन आयफोन रन या नावाने झाली. त्यानंतर २०११ ला याचे नाव बदलून आयओएस केले गेले. २०१५च्या आधी घेतलेल्या आयफोनवरील व्हॉट्स Appची सेवा बंद करण्यात येणार आहे.


हेही वाचा – व्हॉट्स Appवर चॅट ओपन न करता मेसेज वाचण्यासाठी खास ट्रिक

 

- Advertisement -