घरठाणेमोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मृत्यूला लागला ब्रेक

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मृत्यूला लागला ब्रेक

Subscribe

आत्महत्येचा प्रयत्न फसला

मध्य रेल्वेच्या एका लोकल मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीच्या मृत्यूला सुदैवाने ब्रेक लागला. ही घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकानजीक घडली आहे. मात्र, हा थरार पाहून इतर प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला होता.

बदलापूरहून मुंबईच्या दिशेला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जाणारी लोकल ट्रेन अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ येत असता या लोकल ट्रेन समोर एक व्यक्ती रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी अगोदरच झोपला होता.

- Advertisement -

हा प्रकार लोकल मोटरमनच्या लागलीच लक्षात आला. मोटरमनने सावधानता बाळगत वेळीच लोकलला ब्रेक लावले. त्यावेळी गाडी रुळावर झोपलेल्या व्यक्तीच्या एक ते दीड फूट अंतरावर जाऊन थांबली आणि या इसमाचा जीव वाचला. या माणसाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने लोहमार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -