Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Video: बॉडी बिल्डर पडला 'डॉल'च्या प्रेमात; वर्षभराच्या अफेअरनंतर केलं लग्न!

Video: बॉडी बिल्डर पडला ‘डॉल’च्या प्रेमात; वर्षभराच्या अफेअरनंतर केलं लग्न!

Related Story

- Advertisement -

आखाती देशातील कजाकिस्तान येथे राहणाऱ्या एका बिल्डरची अनोखी लव्हस्टोरी समोर आली आहे. हा व्यक्ती जीवंत प्रेयसीच्या प्रेमात पडला नाही तर त्याने चक्क आपल्या घरात असणाऱ्या बाहुलीशी लग्न केले. या बॉडी बिल्डरचे नाव यूरी टोलोश्को असे आहे. याच बाहुलीला या बिल्डरने वर्षभरापूर्वी प्रपोज केले होते. त्याने आपल्या लग्नाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. कजाकिस्तानच्या स्थानिक माध्यम असणाऱ्या टीएनएन नुसार, यूरो टोलोश्को आणि त्याच्या बाहुलीने मार्च महिन्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन असल्याने त्यांनी त्याचे लग्न पुढे ढकलले.

यूरी टोलोस्को (Yurri Tolochko) याच्या बाहुलाचे नाव मार्गो (Margo) असे आहे. यूरीला कोरोनादरम्यानच विवाह बंधनात अडरायचे होते. मात्र काही अज्ञात इसमांनी ऑक्टोबरमध्ये त्याच्यावर हल्ला केला. जेव्हा युरी एका ट्रान्सजेंडर रॅलीत सहभागी होता तेव्हा हा हल्ला झाला. असे असले आता युरी आणि मार्गो पती पत्नी बनले आहेत.

- Advertisement -

टीएनएनने दिलेल्या अहवालानुसार, यूरो टोलोश्कोने वर्षभरापूर्वी मार्गोला प्रपोज केले होते. या बाहुलीसह यूरो लंच आणि डिनर करायचा. जिम, योगा देखील करायचा. यासह तो घरातील सर्व काम देखील तिच्यासह करायचा. इतकेच नाही तर यूरो या बाहुलीसह शारिरीक संबंध देखील ठेवायचा. दरम्यान, यूरोने सांगितले की, जेव्हा माझ्या घरच्यांना या बाहुली म्हणून असणाऱ्या पत्नीचा फोटो दाखवला तेव्हा घरचे नाराज झाले. यानंतर यूरोने त्याच्या बाहुलीची प्लास्टिक सर्जरी देखील केली आणि डॉक्टरांसह एक्सपर्टचे मार्गदर्शन देखील घेतले.

- Advertisement -

यासह इन्स्टाग्रामवर यूरोने त्या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये यूरो त्याच्या बाहुलीसह विवाहबंध झाल्यानंतर खूपच आनंदी आणि खूश दिसतोय.

 

- Advertisement -