हार्दिक-नताशाच्या गुड न्यूजनंतर विराट-अनुष्काचे भन्नाट मीम्स व्हायरल!

सोशल मीडियावर विराट-अनुष्काचे मीम्स तुफान व्हायरल होत आहेत.

Mumbai
hardik pandya natasa stankovic surprise wedding and pregnancy announcement with memes on kohli and anushka by fans
हार्दिक-नताशाच्या गुड न्यूजनंतर विराट-अनुष्काचे भन्नाट मीम्स व्हायरल!

भारतीय संघाचा ऑल-राऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अलीकडेच त्याने आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविच यांनी त्यांच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. हार्दिकने नताशासोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करून ती गर्भवती असल्याचे सांगितले आहे. पण हे पाहून चाहते हैराण झाले आहे. कारण चाहत्यांना हार्दिक पांड्या लग्नाबाबत सांगण्याची उत्सुकता होता. पण त्यांने दुसरी गोड बातमी दिली. मग त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊसच पडू लागला.

नताशा गर्भवती असल्याचे कळल्यानंतर चाहते भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर मीम्स तयार करत आहेत. सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काचे हे मीम्स तुफान व्हायरल होत आहे. काहींनी अनुष्का रडतानाचे मीम्स तयार केले आहेत तर काहींनी विराट वेगवेगळ्या हावभावा देत असल्याचे मीम्स तयार केले आहेत.

दुसरीकडे आईपीएलमध्ये मुंबई इंडियान्सच्या संघात खेळणारा पोलार्डने कुणाला पांड्याला ट्रोल केले आहे. त्याने कुणाला हार्दिककडून काहीतरी शिक असला सल्ला दिला आहे. या वर्षात २०२० च्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी रोजी हार्दिक आणि नताशाने साखरपुड्याचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर हार्दिकने आता नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो शेअर केले आहेत. ‘नताशा आणि माझा इथपर्यंतचा प्रवास खूप मोठा होता आणि आता आम्ही लवकरच आमच्या जीवनात नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत’,अशी हार्दिकने फोटोसोबत पोस्ट लिहिली आहे.


हेही वाचा – हिंदुस्तानी भाऊने एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात केला एफआयआर दाखल!