Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग कडक भावा! निघालं कोल्हापूरचं कनेक्शन पण

कडक भावा! निघालं कोल्हापूरचं कनेक्शन पण

नक्की हा भारतीय तरुण आहे तरी कोण?

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी (२९ नोव्हेंबर)चा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना एका गोष्टींमुळे चांगलाचं चर्चेत राहिला. या सामन्यादरम्यान एका भारतीय तरुणाने एका ऑस्ट्रेलियन तरुणीला भर स्टेडियममध्ये प्रपोज केलं आणि तिने त्यावेळेस त्याला होकार दिला होता. सध्या या ऑस्ट्रेलियातल्या भारतीय तरुणाचं कोल्हापूर कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. ऑस्ट्रेलिया तरुणीला प्रपोज करणाऱ्या तरुणाचं नाव यश पाटील असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या Whatsapp, फेसबुक, ट्विट या सोशल मीडियावर ‘हा भाऊ कोल्हापुरचा निघाला’ असं लिहिलेला त्या दोघांचा फोटो व्हायरल होत आहे.

२९ नोव्हेंबरच्या सिडनी येथे भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना रंगला होता. त्याचवेळेस दुसरीकडे भारतीय तरुण दिपेन मंडालियाने गुडघ्यावर बसून ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड रोज विंबुश (Rose Wimbush) हिला प्रपोज केलं आणि तिला अंगठी घातली. त्यानंतर रोजने दिपेनला होकार दिला. त्यावेळेस स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दोघांचे अभिनंदन केलं. त्यानंतर या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

- Advertisement -

पण या तरुणाबद्दल सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीत काही तथ्य आहे का? तसंच तो खरंच कोल्हापूरचा आहे का? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. पण यात काहीच तथ्य नाही आहे. या तरुणाचे नाव यश पाटील नाही आहे. तसेच सोशल मीडियावर असलेल्या या यश पाटील नावाने असलेल त्याचे अकाऊंट देखील फेक आहे. या तरुणाचं खरं नाव दिपेन मंडालिया (Dipen Mandaliya) असं आहे. बंगळूरू येथून त्याचे ग्रॅज्युवेशन मॅनेजमेंट विभागातून झाले आहे. तो कोल्हापूरचा नाही आहे. तो तरुण बंगळूरूचा आहे.

- Advertisement -

- Advertisement -