Video: पेन्सिल, लाटणं नव्हे पाठ खाजवायला वापरला थेट जेसीबीच

सोशल मीडियावर जेसीबीचा (JCB) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. अंगाला खाज आली की आपण हाताने खाजवतो. मात्र, एका व्यक्तीने असं काही केलं की, तुम्ही सर्वच हैराण व्हाल. एका व्यक्तीला पाठीला खाज आली म्हणून पाठ खाजवण्यासाठी जेसीबीचा वापर केला. सोशल मीडियावर या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स देत आहेत. काहींना हे मजेशीर वाटलं तर काहींनी धोकादायक आणि बेजबाबदारपणा असल्याचं म्हटलं आहे.

या व्हिडीओला फेसबुकवर शेअर करण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये, एक माणूस बांधकाम साइटवर जेसीबीजवळ उभा आहे आणि कपड्याने त्याच्या पाठीवर खाजवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याचं समाधान होत नाही तेव्हा तो जेसीबीसमोर उभा राहतो आणि जेसीबी त्याची पाठ खाजवतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल जगात काहीही होऊ शकतं.

പൊറം ചൊറിഞ്ഞാൽ പിന്നെ എന്താ ചെയ്യാ

പൊറം ചൊറിഞ്ഞാൽ പിന്നെ എന്താ ചെയ്യാ

Posted by ABDUL NASAR on Sunday, 11 October 2020