#My Women’s Day : मासिकपाळीबद्दल बोला आता इमोजीतून

या इमोजीचा वापर करून मासिक पाळीसारख्या विषयावर मोकळेपणाने बोलणे शक्य झाले आहे.

Mumbai
menstruation
मासिक पाळी

संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावरवरील इमोजीचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. असे म्हटले तरी अतिश्योक्ती वाचणार नाही. आजची तरूणाई एकमेकांना भेटून, कट्ट्यावरील गप्पा आणि समोरा-समोर चर्चा करण्यापेक्षा सोशल मिडीयावरील इमोटिकॉन्स म्हणजे सांकेतिक चिन्हांचा वापर करून संवाद साधला जातो. आता या इमोजीमध्ये आणखी एका इमोजीची भर पडली आहे. या इमोजीचा वापर करून मासिक पाळीसारख्या विषयावर मोकळेपणाने बोलणे शक्य झाले आहे.

संवादाचे सांकेतिक प्रतीक

जगातील निम्म्याहून अधिक माणसं प्रत्यक्ष जीवनाचे अनुभव सांगण्यासाठी सांकेतिक चिन्हांचा वापर करतात. मासिक पाळीवर कोणाशीही उघडपणे बोलतांना ही इमोजी संवादाचे सांकेतिक प्रतीक म्हणून काम करते. साधारणपणे महिलांच्या शारीरिक, आरोग्य विषयक समस्यांवर अधिक चर्चा होत नाही, परंतु या प्रतीकामुळे गांभिर्याने चर्चा होईल. सोशल मीडियावर ही इमोजी सोशल मीडियावरील संवादामध्ये भारतीय बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू सोबत अनेक कलाकारांसोबत बऱ्याच दिवसापासून आपली भूमिका मांडत आहेत.

याबाबतीत अधिक जनजागृती

सोशल मीडियावर नवीन आलेल्या या इमोजीला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या मनातील काही गोष्टी, त्यांच्या इच्छा आणि विचार व्यक्त व्हावे याकरिता या इमोजीचा महत्त्वाचा वाटा आहे. मासिक पाळी या विषयावर हल्ली चित्रपट, माहितीपट तयार केले जाऊन याबाबतीत अधिक जनजागृती करण्यात येत आहे. महिलांसह पुरूष देखील अधिक समजूतीने मासिक पाळीवर संवाद करतांना दिसत आहे.

पारंपारिक मतभेद, गैरसमजुती आणि परंपरा याचा विचार करता मासिक पाळीबद्दलची होणारी चर्चा यापासून दूर जात स्त्रीत्वापर्यंत पोहचली आहे. या विषयी अधिक मोकळेपणाने प्रत्येक महिलेला कसे बोलता येईल याचा देखील विचार करणे आवश्यक आहे. मासिक पाळीमुळे मुलींच्या, महिलांच्या शिक्षणात किंवा नोकरी, व्यवसायात कोणती अडचण येणार नाही असा प्रयत्न या महिला दिनाच्या निमित्ताने आपण करूया…


 

हे ही वाचा – तिची अडचण !

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here