Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर ट्रेंडिंग आली लहर केला कहर; पाहा काय झाली प्री वेडिंग शूटची दशा!

आली लहर केला कहर; पाहा काय झाली प्री वेडिंग शूटची दशा!

या प्री वेडिंग शूटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sacramento
strong wave pulled couple along with in california while photo shoot
आली लहर केला कहर; पाहा काय झाली प्री वेडिंग शूटची दशा!

सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वजण कोरोना विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी घरी राहून काळजी घेत आहेत. यादरम्यान अनेकांचा लग्न सोहळा देखील पार पडत आहे. अनेक उत्साही जोडपी या काळात प्री वेडिंग फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करत आहे. पण हेच प्री वेडिंग शूट एका जोडप्याला चांगलचं महागात पडलं आहे. हे जोडप प्री वेडिंग शूट एका समूद्र किनारी करत होतं. पण अचानक असं काही घडलं जे पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही प्री वेडिंग शूटची गंभीर घटना दक्षिण कॅलिफोर्निया मधील आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडप प्री वेडिंगचं शूट एका सुमद्र किनारी करताना दिसत आहे. अचानक शूट सुरू असताना एक मोठी लाट येत आणि त्यामध्ये हे जोडप वाहून जात. पण सुदैवाने त्यावेळी किनाऱ्यावर तैनात असलेले लाईफ गार्ड्स समुद्रात उडी टाकून त्या जोडप्याचा जीव वाचवतात.

या घटनेचा व्हिडिओ एबीसी न्यूज नावाच्या वृत्तवाहिनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच ३५८ जणांनी रिट्विट केला आहे. पाहा या घटनेचा व्हिडिओ…


हेही वाचा – लॉकडाऊन पडले महाग, वजन वाढले दोनशे पार!