WhatsApp तात्काळ अपडेट मारा; डेटा चोरीला जाण्याची शक्यता

Mumbai
invisible on WhatsApp
प्रातिनिधिक छायाचित्र

आज दैनंदिन संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्सअॅप आपल्या जीवनाचा भाग बनले आहे. चॅटिंग, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी सर्रासपणे आपण फक्त व्हॉट्सअॅपवर अवलंबून आहोत. मात्र आता एक धोक्याची घंटा खुद्द व्हॉट्सअॅपने दिली आहे. व्हॉट्सअॅपवर हॅकर्सने हल्ला केला आहे, त्यामुळे वापरकर्त्यांचा डेटा चोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीकडून अॅपच्या सुरक्षेत गडबड झाल्यामुळे स्पायवेयर नावाचे सॉफ्टवेअर इंन्स्टॉल होत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हॉईल कॉल आल्यानंतर त्यांचा डेटा चोरीला जाऊ शकतो. व्हॉट्सअॅपची ही चूक त्यांच्या मातृसंस्था म्हणजेच फेसबुकला देखील भारी पडू शकते, असे सांगितले जात आहे.

यानंतर व्हॉट्सअॅपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वापरकर्त्यांचा डेटा हॅकर्सच्या हाती लागण्याची भीती आहे. हॅकिंगपासून वाचण्यासाठी वापरकर्त्यांनी तात्काळ आपले अॅप अपडेट करावे. तसेच शक्य झाल्यास मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम देखील अपडेट करावी, असा सल्ला कंपनीतर्फे देण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅपने आपल्या नवीन अपडेटमध्ये आपली चूक सुधारली आहे. नवीन मालवेअर नुसार हॅकर्स वापरकर्त्यांना व्हॉईस कॉल करून त्यांच्या मोबाईलमध्ये व्हायरसचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतात. फायनान्शिएल टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार हे स्पायवेयर इस्त्रायलच्या एनएसओ नावाच्या कंपनीने बनवले आहे. या कंपनीवर याआधीही मिडल ईस्ट आणि मेक्सिकोतील सरकारी उपक्रम आणि पत्रकारांवर हेरगिरी केल्याचा आरोप केला गेला होता.