घरमहाराष्ट्रपद्मसिंह पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात जुंपली 

पद्मसिंह पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात जुंपली 

Subscribe

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार वार, पलटवार सुरु आहेत. सुप्रिया यांनी डॉ. पद्मसिंह पाटील व त्यांचे चिरंजीव राणा जगजीत सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशावर खोचक टीका केली होती. वडिलांना अर्ध्या रस्त्यावर सोडून राणा पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. तर डॉ. पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना भाजपने प्रवेश नाकारल्याचा टोला  सुप्रिया यांनी मारला. यावर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत कुरघोड्यांना पायबंद घातला असता तर आज पक्षावर ही वेळ आली नसती, असा जोरदार प्रति टोला पद्मसिंह यांनी मारला आहे

या साऱ्या प्रकारामुळे  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांचे निकटवर्तीय राहिलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबातील वाद चांगलाच चिघळला आहे

- Advertisement -

सुप्रिया मला मुलीसारख्या आहेत. त्यांनी माझी काळजी व्यक्त करताना वस्तुस्थितीला धरून मत व्यक्त केले असते तर आनंद वाटला असता. राष्ट्रवादीचे उस्मानाबाद येथील नेते व कार्यकर्त्यांनी मिळून जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पक्षबदलाचा आग्रह धरला होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून राणांच्या पक्षांतराचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी मी स्वत: तुळजापूरपर्यंत त्यांच्यासोबत जाऊन त्यांना आशीर्वाद दिले होते. २०१४ पासून प्रकृतीच्या कारणामुळे मी राजकारणात सक्रीय नाही.

त्यामुळे माझा पक्षप्रवेशाचा प्रश्नच नव्हता. सुप्रियांना देखील हे माहीत आहे, असे असताना त्यांनी माझा पक्षप्रवेश रोखण्याबाबतचे विधान करणे खेदकारक आहे. सुप्रियांनी माझ्यापेक्षा पक्षातील नेत्यांची काळजी घेतली असती, पक्षांतर्गत कुरघोड्यांना वेळीच पायबंद घातला असता तर पक्षावर कदाचित आज ही वेळ आली नसती, याकडे पद्मसिंह यांनी लक्ष वेधले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -