भाजपचा राज्यपालांच्या निमंत्रणाला नम्रपणे नकार

सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसताना अखेर भाजपकडून सत्ता स्थापन करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai
cm
cm

सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसताना अखेर भाजपकडून सत्ता स्थापन करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रविवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीचा निर्णय संध्याकाळी ४ च्या सुमारास समोर येईल, असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी निर्णय राखून ठेवला. अखेर संध्याकाळची बैठक ६ वाजता संपल्यावर भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

या भेटीत भाजप सत्ता स्थापन करणार नाही, असे भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. संध्याकाळी ६.१५ च्या दरम्यान भाजपाच्या नेत्यांनी राजभवनाबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. शिवाय, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

शिवसेनेने महायुतीला दिलेल्या जनादेशाचा अपमान केला, शिवसेनेला राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सत्ता स्थापन करायची असल्याची ते करू शकतात. त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. सध्या भाजप सरकार स्थापन करू शकत नाही, महायुतीला जनतेने भरघोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला नव्याचे राज्यात सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. जनादेश महायुतीला मिळाला. शिवसेना महायुतीसोबत येण्यास तयार नाही. त्यामुळे, आम्ही सरकार स्थापन करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करत सत्ता स्थापनेबाबतचा आपला निर्णय दिला. या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते.

सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे नाट्य संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास संपले. दरम्यान, अजूनही सत्ता स्थापनेवरुन खलबतं सुरू आहेत. आता यापुढे शिवसेना कोणासोबत जाणार आणि कधी सत्तास्थापन होणार? याविषयी साशंकता आहे. शिवाय, काँग्रेस, राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हेही महत्त्वाचं आहे. सर्वात मोठा भाजप पक्ष विरोधी पक्षात बसणार का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा –

Live : राज्यपालांचे शिवसेनेला आमंत्रण