घरमहाराष्ट्रपहिल्याच कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला दिलासा

पहिल्याच कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला दिलासा

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलीच कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत दोन निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ६०६ कोटींचे तरतूद केलेली होती. यापैकी २० कोटी खर्च झाले आहेत. पुढचे २० कोटी मंजूर करण्यासाठी आज मंजूर देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविण्यात आल्या त्याचे वास्तववादी चित्रण करणारा अहवाल मुख्य सचिवांकडून मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानतंर शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -