घरमहाराष्ट्रडोंबिवली स्मार्ट लोकांची बकाल सिटी - राज ठाकरे

डोंबिवली स्मार्ट लोकांची बकाल सिटी – राज ठाकरे

Subscribe

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज डोंबिवली येथे विधानसभेच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी डोंबिवलीच्या विकासाकडे लक्ष वेधले. “सुशिक्षित लोकांचे बकाल शहर अशी डोंबिवलीची ओळख असल्याचे ते म्हणाले. भारतातील सर्वात जास्त सीए डोंबिवलीतून बाहेर पडतात. मात्र त्यांनी शहराचे कधी ऑडिट केले नाही. ऑडिट केले नसल्याने हे शहर बकाल झाले आहे. डोंबिवली स्मार्ट लोकांची बकाल सिटी बनली असल्याचे राज ठाकरे यांनी सांगत याचे खापर महानगरपालिका आणि राज्य सरकारवर फोडले.

मुख्यमंत्र्यांनी सव्वा लाख खड्डे मोजून दाखवले

मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस हे चांगले व्यक्ती असल्याचे मी एका मुलाखतीमध्ये म्हणालो होतो. मात्र त्यांनी भ्रमनिरास केलेला आहे. त्यांनी सव्वा लाख विहिरी बांधल्या असल्याचे खोटे सांगतिले. बहुतेक त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांची आकडेवारी सांगितली असेल, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी डोंबिवली शहराला साडे सहा हजार कोटी देऊ असे सांगितले होते. ते पैसे कुठे गेले? असा सवालही उपस्थित केला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -