घरमुंबईजिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात दिव्यांग, जेष्ठांना घरपोच वाहतूक सुविधा

जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात दिव्यांग, जेष्ठांना घरपोच वाहतूक सुविधा

Subscribe

दिव्यांग मतदारांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी पाहणी करून घेतला आढावा

जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात असणाऱ्या दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सुलभ पद्धतीने जाण्यासाठी मोफत आणि घरपोच वाहतूक सुविधेची सोय करण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी पाहणी करून आढावा घेतला. यंदा भारत निवडणुक आयोगाचे ‘नो वोटर टू बी लेफ्ट बिहॅड’ असे घोषवाक्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही निवडणुक सुलभ निवडणुक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे.

दिव्यांग मित्र समन्वयकाची नेमणूक

दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग समन्वयकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. सबंधित दिव्यांग मतदार यांनी राहत असलेल्या ठिकाणाहून जवळच्या ठिकाणच्या दिव्यांग मित्र समन्वयकास भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास आवश्यक वाहन सुविधा घरपोच उपलब्ध करून देण्यात येईल. मतदारस मतदारास मतदानकेंद्रापर्यंत घेऊन जाऊन प्राधान्याने मतदान झालेनतर पुन्हा दिव्यांग मतदारास त्याच वाहनाने घरी सोडविले जाईल. या मतदारास विनासायास मतदान करता यावे यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्यात येईल. जिल्हामध्ये एकूण १९९ ठिकाणाहून एकूण ७१९ रिक्षा मतदानाच्या दिवशी पूर्णवेळ दिव्यांग आणि जेष्ठ मतदार यांचेसाठी कार्यरत असतील.

- Advertisement -

हात दाखवा बस थांबवा

दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांना १३८ कल्याण (प), १४२ कल्याण (पूर्व), १४३ डोंबिवली, १४४ कल्याण (ग्रामीण) १४६ ओवळा – माजिवाडा, १४७ कोपरी –पांचपाखाडी, १४८ ठाणे, १४८ मुंब्रा- कळवा १५० ऐरोली, १५१ बेलापूर असे दहा रिंगरूट तयार करण्यात आलेले असून या मार्गावर मतदानाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला दिव्यांग फ्रेंडली लो फ्लोवर बस चालू असणार आहे. या बस मधून हात दाखवा, बस थांबवा या धर्तीवर दिव्यांग व जेष्ठ मतदार या वाहतूक सुविधेचा लाभ घेवू शकणार आहेत.

दिव्यांग मतदारांसाठी सुविधा

दिव्यांग मतदारांना ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा देण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था देखील असणार आहे. अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य आहे. लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

२३९५ स्वयंसेवकांची नेमणूक

जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हामध्ये विविध कॉलेजमधील एन. एस. एस. आणि इतर २३९५ स्वयंसेवकांची नेमणूक केलेली आहे. त्यांचा वापर करून दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना सुलभ मतदान करता यावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.


विधानसभा निवडणूकीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -