घरमहाराष्ट्रफडणवीसांचे अभिनंदन करताना जयंत पाटील यांनी अजितदादांनाही सुनावलं

फडणवीसांचे अभिनंदन करताना जयंत पाटील यांनी अजितदादांनाही सुनावलं

Subscribe

‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल म्हणाले होते. पण आल्यावर कुठे बसणार हे त्यांने सांगितले नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेतेपदी बसल्यानंतर आता अभिनंदन केले पाहीजे. मी असे बोलणार नाही की, आपण कायम विरोधी पक्षनेतेपदी बसणार. कारण त्याने उत्साह कमी होतो. तुम्ही पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने आणि लोकशाही मार्गाने २०२४ इथे सत्ताधारी बाकावर या’, असा सल्ला देत असताना जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत चिमटे काढत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते झाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केले.

‘सदसदविवेकबुद्धी जागी ठेवा’

महाराष्ट्र विकास आघाडीने सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन शपथविधी उरकला होता. यावर जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. फडणवीसांना बोलताना ते म्हणाले की, ‘आपण आपली सदसदविवेकबुद्धी जागी ठेवाल आणि पाच वर्षांनंतरच सत्ताधारी बाकावर येण्याचा प्रयत्न कराल, अशा शुभेच्छा आपल्याला देतो. त्या दरम्यान इथल्या कोणत्याही सदस्याने आपल्याला इथे येण्यासाठी प्रलोभन दाखवले तर त्या प्रलोभनाला आपण भुलणार नाही. आपली सद्सदविवेक बुद्धी जागी ठेवाल, अशी अपेक्षा करतो’, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते जंयत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना टोले लगावले.

- Advertisement -

भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लायक असलेले उमेदवार हे देवेंद्र फडणवीसच होते. हे आम्हाला मान्य करावे लागेल. राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्रीपदासाठी लायक नाहीत, असे जयंत पाटील यांनी सागंताच सभागृहात एकच हशा पिकला. यावर स्पष्टीकरण देताना जयंत पाटील म्हणाले की, ‘विखे पाटील आमचेच आहेत. त्यांना कधीही आम्ही इकडे घेऊ शकतो.’

‘देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मला एकदा सभागृहात म्हणाले होते की, ऑक्टोबर २०१९ साली शिवडी-न्हावा-शेवा ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचे उद्घाटनाला मला ते सोबत नेणार होते. मी त्यावेळी गंमतीने म्हणालो होतो की, लवकर प्रकल्प पुर्ण करा नाहीतर आमचे सरकार आल्यानंतर आमच्यासोबतच तुम्हाला यावे लागेल. ती वेळ इतक्या लवकर येईल, असे वाटले नव्हते’, असे देखील जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -