घरमहाराष्ट्रनिलेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, 'चार हाडांचा बीएमसी चोर'

निलेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, ‘चार हाडांचा बीएमसी चोर’

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी कोकण दौऱ्यावर होते. बुधवारी त्यांची कणकवली येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर सडकून टीका केली. या टीकेनंतर नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर टीका केली आहे. ‘चार हाडांचा बीएमसी चोर आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इकडे वाकव मान, तिकडे वाकव मान, म्हणे स्वाभिमान; उद्धव ठाकरेंची राणेवर टीका

कणकवलीत चुरशीची लढत

उद्धव ठाकरे बुधवारी कणकवली येथील शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी गेले होते. या मतदारसंघात भाजपकडून नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी त्यांच्या प्रचाराप्रत्यर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीत गेले होते. त्यानंतर बुधवारी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कणकवलीत गेले. शिवसेनेने या मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचे पूर्वीचे निकटवर्तीय सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. राज्यभरात भाजप-शिवसेना महायुती असूनही या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर लढणार आहेत. त्यामुळे कणकवलीत युती नसल्याचे उघडपणे दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांना ईडीने नोटीस का बजावली? मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -