घरमहाराष्ट्रपरळीची लढत सोपी नाही; पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी अमित शाह नंतर मोदीही येणार

परळीची लढत सोपी नाही; पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी अमित शाह नंतर मोदीही येणार

Subscribe

विरोधकांना त्यांच्या नेत्यांना बीडमध्ये सारखं मुक्कामाला का बोलवावं लागतं? विरोधक तर सक्षम आहेत, असा सवाल पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे.

परळीची लढत सोपी नसणार, असे काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. परळीतून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. यावेळी युती आणि आघाडी एकत्र लढत असल्यामुळे परळीत जोरदार संघर्ष होणार, हे नक्की आहे. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यासाठी सावरगाव येथे अमित शाह यांना मेळाव्यासाठी बोलावले होते. तर आता १८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत सभा घेणार आहेत. आम्हाला विरोधकच उरलेले नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी बीडच्या परळीत मात्र राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १८ ऑक्टोबरला बीडच्या परळी मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहेत. पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला की, विरोधकांचे असे म्हणणे आहे की ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना येथे का बोलवावे लागते’? यावर पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर टीका केली. ‘विरोधकांना त्यांच्या नेत्यांना बीडमध्ये सारखं मुक्कामाला का बोलवावं लागतं? विरोधक तर सक्षम आहेत’, असा प्रतिप्रश्न पंकजा मुंडे यांनी केला आहे.

- Advertisement -

‘पंतप्रधानांना कोणीही आणू शकत नाही. ते राज्यातील प्रत्येक मतदारसंघासाठी बोलू शकतात. ते पाच वर्षांपूर्वीही बीडमध्ये आले होते. ते परंपरेनुसार इथे येत आहेत. लोकसभेवेळी एक ही नेता प्रचारसभेसाठी आला नाही तर आम्ही चांगल्या मताधिक्याने जिंकून आलो’, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या ?

‘आम्हाला विजयी होण्यासाठी पंतप्रधानांना त्रास द्यायची गरज नाही. त्यासोबत आमचा कोणत्याच नेतृत्वाला त्रास होत नाही. पण, विकासाच्या दृष्टीने पंतप्रधानांचं इथे येणं हा एक चांगला पायगुण ठरणार आहे. त्यामुळे, विरोधकांनी फार आकाणतांडव करु नये, असं ही पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय. पण, या सर्वात ते महायुतीचंच सरकार येणार हे सांगायला ही त्या विसरल्या नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘धरणं भरण्यापेक्षा, जेवण करणे कधीही चांगले’; उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -