घरमुंबईनवरात्रौत्सवाला राजकीय रंग; गरबा दांडीयातून रंगणार मतांचे राजकारण!

नवरात्रौत्सवाला राजकीय रंग; गरबा दांडीयातून रंगणार मतांचे राजकारण!

Subscribe

डोंबिवलीत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा 'नमो रमो नवरात्री' तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा 'रास गरबा' रंगणार आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईसह ठाण्यात गरबा दांडियाची धूम आहे. पण याचवेळी विधानसभा निवडणुका आल्याने नवरात्र उत्सवाला राजकीय रंग चढला आहे. त्यामुळे गरबा दांडीयातून मतांचे राजकारण रंगणार असल्याचेच दिसून येत आहे. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखण असणाऱ्या डोंबिवलीत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा ‘नमो रमो नवरात्री’ तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ‘रास गरबा’ रंगणार आहे. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला नवरात्रौत्सव शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या दिमाखात सुरू आहे. शिवसेना व भाजपा युतीबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र सेना भाजपात मतांची चढाओढ यातून होणार असल्याचे दिसून येतय.

हेही वाचा – कल्याणमध्ये शिवसेनेचा भाजपाविरोधात बंडखोरीचा आवाज!

यंदा गरब्यात राजकीय प्रचार

डोंबिवलीचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावतीने हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकुलात ‘नमो रमो नवरात्री’ तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डीएनसी शाळेच्या मैदानावर डोंबिवली ‘रास गरबा’चे आयोजन केले जाते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. मात्र नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यातच नवरात्र उत्सव आल्याने राजकीय मंडळींना मतदारांपर्यंत जाण्यासाठी चांगलीच संधी मिळाली आहे. नवरात्र उत्सव हा केवळ गुजराती, मारवाडी, हिंदी भाषिक लोकांपुरता मर्यादीत राहिला नसून सर्वच भाषिक सहभागी हेात असतात. तरूण तरूणाई मोठया प्रमाणात सहभागी होत असते. त्यामुळे नवरात्र उत्सव हा राजकीय व्यक्तींसाठी प्रचाराचं उत्तम साधन ठरत आहे. खासदार शिंदे यांच्या गरब्यासाठी डीएनसी मैदानावर ५० हजार चौरस फूट अशा वूडन फ्लोअरवर एकाचवेळी १० हजारपेक्षा जास्त गरबाप्रेमी गरबा खेळू शकतील अशी भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. सुप्रसिध्द गायक मनीषा सावला व बिपीन युनावाला याचा लाईव्ह आर्केस्ट्रा असणार आहे. या उत्सवासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. तर राज्यमंत्री चव्हाण यांनी क्रीडासंकुलातील मैदानावरील गरब्यासाठी मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रेटी गरब्यामध्ये हजेरी लावणार आहेत. यंदाचा नवरात्र उत्सव हा राजकीय नेतेमंडळींसाठी प्रचाराची पर्वणीच ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -