घरमहाराष्ट्रआजपासून सभांचा धडाका सुरु; चार मोठ्या नेत्यांच्या सभा

आजपासून सभांचा धडाका सुरु; चार मोठ्या नेत्यांच्या सभा

Subscribe

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या महाराष्ट्रातील चार मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २१ ऑक्टोबरला राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. आता हेच पक्ष आजपासून रस्त्यावर उतरुन निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या महाराष्ट्रातील चार मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. मुख्यमंत्री आज धुळे दौऱ्यावर आहेत, उद्धव ठाकरे संगमनेर, राज ठाकरे पुणे तर शरद पवार अकोला आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत. हे चारही नेते काय बोलतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे.

शरद पवार यांचा आज अकोला आणि वाशिम दौरा

शरद पवार आज सकाळी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अकोल्यातील बाळापूर येते सकाळी साडे अकरा वाजता त्यांची सभा होईल. त्यानंतर ते वाशिमच्या दिशेला मार्गस्थ होणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा येथे दुपारी ४ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचा आज धुळे दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावर आहेत. धुळे ग्रामीण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानज्योत भदाणे यांच्या प्रचारासाठी शिरपूर येथे दुपारी बारा वाजता त्यांची सभा होईल. त्यानंतर साक्री येथे महायुतीचे उमेदवार मोहन सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी दुपारी एक वाजता सभा होईल.

उद्धव ठाकरे संगमनेर दौऱ्यावर

उद्धव ठाकरे आज संगमनेर दौऱ्यावर आहेत. संगमनेरव येथील जाणता राजा मैदान येथे त्यांची दुपारी बारा वाजता त्यांची सभा होईल. दुपारी दोन वाजता श्रीरामपूर येथे त्यांची सभा होईल. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता पारनेर तर अहमदनगर येथे दुपारी सहा वाजता असा एकूण चार सभा उद्धव ठाकरे घेणार आहेत.

- Advertisement -

राज ठाकरे पुण्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा आज पुण्यात होणार आहे. ही सभा आज संध्याकाळी सहा वाजता पुण्याच्या सरस्वती मंदिर मैदानात होणार आहे.


हेही वाचा – हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे – एकनाथ खडसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -