घरमुंबईस्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न'च्या शिफारसीवरुन शिवसेनेची भाजपवर टीका

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’च्या शिफारसीवरुन शिवसेनेची भाजपवर टीका

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी महायुतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या शिफारसीचे कौतुक केले होते. मात्र, 'सामना' अग्रलेखात शिवसेनेने याच मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली आहे.

‘आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करु त्यासाठी भाजपला मतदान करा असे भाजपच्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात असा संदर्भ येणे हे क्लेशदायक आहे’, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपवर ‘सामना’ मुखपत्रातून टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी महायुतीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या शिफारसीचे कौतुक केले होते. मात्र, ‘सामना’ अग्रलेखात शिवसेनेने याच मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली आहे.

हेही वाचा – सलमान खानच्या ‘शेरा’चे शिवसेनेत प्रवेश

- Advertisement -

नेमके काय म्हटले आहे अग्रलेखात?

‘गेल्या पाच वर्षात वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवणान्वित करायला हवे होते. सरकार आपलेच होते. सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारकांचे महानायक होते. पण आपल्या देशातील एक वर्ग महात्मा गांधींना खलनायक ठरवत आहे, तर दुसरा वर्ग महात्मा गांधींना खलनायक ठरवत आहे. हे कधीतर थांबायला हवे. भाजप त्यांच्या जाहीरनाम्यात म्हणते, सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करु. आम्ही विचारतो, सावरकरांना इतके वाईट दिवस आले आहेत काय, की त्यांना शिफारसीची गरज पडावी? सावरकरांना स्वातंत्र्यवीर मानायला काँग्रेस व त्यांचे बगलबच्चे तयार नाहीत. मग पी. चिदंबरम, रॉबर्ट वढेरा वगैरेंना स्वातंत्र्यवीर मानायचे काय?’, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -