घरमुंबईका काढली जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा?

का काढली जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा?

Subscribe

आमदार जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. निवडणुकीचे कारण देऊन ही सुरक्षाव्यवस्था काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या २० वर्षांपासून ठाणे पोलीस दलाकडून देण्यात आलेली सुरक्षा व्यवस्थादेखील काढण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड हे आता सुरक्षा रक्षकांशिवाय फिरताना दिसतील. मात्र त्यांची सुरक्षा व्यवस्था का काढण्यात आली यावर विविध तर्क लावले जात आहेत.

सरकारकडून देण्यात आलेली Y + सुरक्षा

कोर्टाने जितेंद्र आव्हाड यांच्या हत्येचा कट असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांना सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली होती. मात्र आता निवडणुकीचे कारण पुढे करत ही सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. त्यांच्याकडे २० वर्षांपासून असलेली अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था देखील काढून घेण्यात आली होती. मात्र आता सरकारकडून देण्यात आलेली Y + ही सुरक्षा व्यवस्था आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था देखील काढून टाकण्यात आली आहे.

- Advertisement -

हे असावे कारण 

केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकारवर सडकून टीका करणाऱ्या विरोधकांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड हे अग्रणी आहेत. नेहमीच ते त्यांनी भूमिका परखडपणे मांडतात. कधी प्रत्यक्ष तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळेच की काय आव्हाड यांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -