घरमहाराष्ट्रखुशखबर! एसटीचे 'ते' निलंबित कामगार पुन्हा कामावर!

खुशखबर! एसटीचे ‘ते’ निलंबित कामगार पुन्हा कामावर!

Subscribe

निलंबीत करण्यात आलेल्या 'एसटी' च्या १ हजार १० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासंबधीचं परिपत्रक राज्य सरकारकडून जारी करण्यात आलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून रोजी वेतनवाढीच्या मुद्दायवरुन अघोषित संप पुकारला होता. या संपात रोजंदारीवरील एकूण १ हजार १० कामगारांनी सहभाग घेतला होता. एसटी महामंडळाने या सर्वांच्या विरोधात कारवाई करत काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले होते. याप्रकरणी आता पुढे काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. याप्रकरणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आवाहन केले होते.

कामगारांना अखेर ‘दिलासा’

इतक्या मोठ्या संख्येने एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यामुळे सगळीकडे नाराजीसोबतच चिंतेचं वातावरण होतं. ८ आणि ९ जून रोजी या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी बेमुदत संप घोषित केला होता. कामगारांनी पुन्हा असे संप करु नयेत याची समज देण्यासाठी संपातील सर्व कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. निलंबित झालेल्या या कर्मचाऱ्यांचं पुढे काय होणार? हा प्रश्न उभा राहिला होता. मात्र अखेर या कामगारांना दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाने या सर्व कार्मचाऱ्यांचं निलंबन रद्द करत त्यांनी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

जुलैमध्ये होणार ‘नियुक्ती’

दरम्यान निलंबन मागे घेण्यात आलेल्या १ हजार १० कर्मचाऱ्यांना, एसटी महामंडळाने पुढील महिन्यात कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या कार्य समाप्तीचे आदेश देण्यात आल्यामुळे, १ जुलै पासून त्यांची पुर्ननियुक्ती करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून याप्रकरणी योग्य ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

संपाची नेमकी पार्श्वभूमी काय?

वेतन वाढीच्या मुद्द्यावरुन ८ आणि ९ जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपा पुकारला होता. या संपामध्ये भाग घेतल्यामुळे एकूण १,०१० कर्मचाऱ्यांची सेवा एसटी महामंडळाकडून समाप्त करण्यात आली होती. त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील ५०३ उमेदवारांना तातडीने चालक तथा वाहक प्रशिक्षण देण्यात असल्याचे एसटी महामंडळातर्फे बोलण्यात येत होते. सेवा समाप्तीच्या या निर्णयाविरोधात अधिक तीव्र आंदोलन उसळण्याची चिन्हे होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -