घरक्रीडा'यो-यो' टेस्टवरून बीबीसीआय-सीओएमध्ये मतभेद

‘यो-यो’ टेस्टवरून बीबीसीआय-सीओएमध्ये मतभेद

Subscribe

भारतीय क्रिकेटमध्ये आता यो-यो या फिटनेस टेस्टवरून बीसीसीआय आणि सीओएमध्ये मतभेद असल्याचे पाहायाला मिळत आहे. यासंदर्भात सीओएने बीसीसीआयला विचारणा केली आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये आता यो-यो या फिटनेस टेस्टवरून नव्या वादाला सुरूवात झाली आहे. यासंदर्भात बीसीआयचे सीईओ राहुल झोरी यांनी जनरल मॅनेजर सबा करीम यांना सोमवारी सकाळी यो-यो टेस्टच्या व्यवहार्यतेबद्दल केवळ एका ओळीचा ई मेल केला आहे. यानंतर बीसीसीआयचे खजिनदार अनिरूद्द चौधरी यांनी सीओए म्हणजेच कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनला यासंदर्भातील भला मोठा ई मेल केला आहे. ज्यामध्ये यो- यो टेस्टसाठी कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो याची माहिती देण्यात आली आहे. क्रिकेटच्या तंदुरस्तीसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षीपासून यो-यो टेस्ट सक्तीची केली आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात सीओएने भारतीय क्रिकेट बोर्डाला यो-यो टेस्ट सक्तीची का? अशी विचारा केली आहे. यो-यो टेस्टवरून सध्या बीसीसीआय आणि सीओएमध्ये वादाला सुरूवात झाली आहे. यानंतर प्रशासकीय समिती अर्थात सीओएने यो-यो टेस्ट घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. शिवाय यो-यो टेस्ट सक्तीची का? अशी विचारणा केली आहे.

यो-यो सक्तीचीच – रवी शास्त्री

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी यो-यो टेस्ट सक्तीची आहे. तुम्ही यो-यो टेस्टमध्ये पास झालात तरच तुम्हाला भारतीय संघामध्ये स्थान मिळेल असे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंड दौऱ्याला जाण्यापूर्वी स्पष्ट केले आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी अंबाती रायडू याची संघात निवड झाली. पण, यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्याने रायडूला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आले. शिवाय मोहम्मद शमी, संजू सॅमसनला देखील यो-यो टेस्टमध्ये नापास झाल्याने इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आले. यावरून निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर रवी शास्त्री यांनी यो-यो टेस्टचे समर्थन केले आहे. शिवाय, कर्णधार विराट कोहलीने देखील रवी शास्त्री यांच्या मताशी सहमत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या बीसीसीआय आणि सीओएमध्ये यो-यो टेस्टवरून मतभेद सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -