घरदेश-विदेशकॅनडाला जाताय ! आता मिळणार झटपट व्हिसा

कॅनडाला जाताय ! आता मिळणार झटपट व्हिसा

Subscribe

तुम्ही कॅनडाला शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण आता कॅनडासाठीचा व्हिसा अगदी झटपट मिळणार आहे. कॅनडाने व्हिसा मिळवण्यासाठी साधी आणि झटपट अशी नवी प्रणाली तयार केली असून कॅनडाला शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल.

कसा मिळणार कॅनडाचा व्हिसा?

विद्यार्थ्यांना व्हिसा मिळवण्यासाठी या आधी कमीत कमी ६० दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता केवळ ४५ दिवसांमध्ये हा व्हिसा मिळणार आहे. केवळ चार देशांसाठी ही सुविधा कॅनडा सरकारने उपलब्ध करुन दिली आहे. यात भारत, चीन, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशाचा समावेश आहे. पूर्वी कागदपत्रांची पूर्तता करताना लागणारा वेळ नव्या प्रक्रियेत कमी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कॅनडाला अधिक पसंती

परदेशी शिक्षणासाठी अमेरिकेला सर्वाधिक पसंती असते. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा धोरणांमध्ये बदल केले. त्यामुळे अमेरिकेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. अनेकांनी इतर देशांचे पर्यायही समोर ठेवले. भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेनंतर कॅनडाला अधिक पसंती दिली जाते. हे एका सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. २०१७ च्या आकडेवारीनुसार ही वाढ ५८ टक्क्यांनी झाली होती. कॅनडाला मिळणाऱ्या अधिक पसंतीमुळेच कॅनडा सरकारने अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आणि व्हिसासाठी कमी त्रास व्हावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेकडे पाठ?

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेतले. अनेक निर्णयांमुळे नाराजीचे सूर देखील उमटले. विशेषत: अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी अनेक नियम लागू केले आहेत. अमेरिकेतील भारतीयांची वाढत्या संख्येमुळे स्थानिकांना नोकऱ्या मिळणे कठीण झाले होते.  त्यामुळे ही संख्या कमी करण्यासाठी अमेरिकेने व्हिसा धोरण अधिक जाचक केले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अमेरिकेकडे पाठ फिरवली असली तर अाजही अमेरिकेला सर्वाधिक पसंती आजही दिली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -