घरमुंबई'दबाव आणणार्‍या औषध पुरवठादारांना मेस्मा लावा', स्थायी समितीत मागणी

‘दबाव आणणार्‍या औषध पुरवठादारांना मेस्मा लावा’, स्थायी समितीत मागणी

Subscribe

औषध वितरक कंपन्यांनी अचानक औषध पुरवठा बंद केल्यामुळे मुंबईत रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवू लागला. मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीमध्ये या मुद्द्यावर आज चर्चा झाली.

महापालिकेची रुग्णालये, दवाखाने तसेच प्रसूतीगृहांमध्ये औषधांचा पुरवठा करणार्‍या वितरक कंपन्यांमुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने महापालिकेने दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे औषध वितरक कंपन्यांच्या असोसिएशनने त्वरीत औषधांचा पुरवठा न करण्याचा इशारा दिला. त्याचा तीव्र निषेध स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी नोंदवत त्यांच्याविरोधात मेस्मा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, स्थायी समितीत तीव्र पडसाद उमटताच अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत असोसिएशनने औषधांचा पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले.

स्थायी समितीत औषधांचाच बोलबाला!

महापालिकेच्या १३ दवाखान्यांमध्ये औषध निर्मितीच्या पदांना सातत्य देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून महापालिका प्रशासनावर दबाव आणून रुग्णांची गैरसोय करणार्‍या औषध कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. ‘रुग्णालये ही अत्यावश्यक सेवेत मोडत आहेत. आणि औषधांचा पुरवठा न केल्यामुळे महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे रुग्णांना आणि महापालिकेला वेठीस धरणे योग्य नसल्याचे’, त्यांनी सांगितले. त्यामुळे ‘त्यांना काळ्या यादीत टाकून बाहेरून औषधांची खरेदी केली जावी’, अशी सूचना केली.

- Advertisement -
वाचा – मुंबई महापालिका हॉस्पिटल्समधील औषध पुरवठा आजपासून बंद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी ‘औषध पुरवठा करणार्‍या कंपन्यांची अरेरावीची भूमिका योग्य नसून त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे’, अशी भूमिका मांडली. शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी ‘दबाव आणणार्‍या कंपन्यांना त्यांची जागा दाखवावी, नगरसेवक आपल्या पाठिशी असल्याचे’, सांगितले. ‘रुग्णालये ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने कुठेही कंपन्यांची गय केली जाऊ नये’, असे सांगितले. यावर प्रशसनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी ‘कोणत्याही कंपन्यांच्या दबावापुढे प्रशासन झुकणार नसून त्यांना मुंबईकरांना वेठीस धरू दिले जाणार नाही. त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. तसेच रुग्णालयांमध्ये कुठेही औषधांचा तुडवडा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल’, असे सांगितले.

अश्विनी जोशींसोबत झाली बैठक

दरम्यान, संध्याकाळी औषध वितरक कंपन्यांच्या वितरक असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत नमते घेत असोसिएशनने ‘औषधांचा पुरवठा पूर्ववत केला जाईल’, असे आश्वासन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -