घरमुंबईमुंबईतील सर्व नाले होणार पॉलिकार्बोनेट शीटद्वारे बंदिस्त!

मुंबईतील सर्व नाले होणार पॉलिकार्बोनेट शीटद्वारे बंदिस्त!

Subscribe

मुंबईतील नाल्यांवर पॉलि कार्बोनेट शीट्सचं अच्छादन करण्याचा निर्णय अखेर पालिकेने घेतला असून त्यासंदर्भातील काही नियमावली कंत्राटदार किंवा विकासकासाठी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व नाले आता पॉलिकार्बोनेट शीटच्या माध्यमातून आच्छादित केले जाणार असून शाळा, कॉलेज, रुग्णालय, मंदिर आदींसह झोपडपट्टी तसेच रस्त्यालगतच्या ६ मीटर रुंदीपर्यंतचे नाले बंदिस्त केले जाणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत बुधवारी हे धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील उघडे नाले बंदिस्त करण्याची रहिवाशी आणि नगरसेवकांची मागणी आता प्रत्यक्षात साकारली जाणार आहे. दहिसर पूर्व येथील उघडा नाला पॉलिकार्बोनेटद्वारे बंदिस्त करण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता राष्ट्वादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी याबाबतचे धोरण जाहीर करावे, अशी सूचना केली. मुंबईतील सर्वच नगरसेवकांची ही मागणी असून केवळ धोरणाअभावी ही कामे हाती घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही मुंबईतील नाले पॉलिकार्बोनेटदृवारे बंदिस्त केल्यास ५० टक्के नालेसफाईचे काम कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

नाल्यात उतरण्यासाठी लोखंडी शिडी बंधनकारक

प्रशासनाने याबाबतचे धोरण जाहीर करून उघड्या नाल्यावर कमानीच्या आकाराचे, लोखंडी अँगल्स आणि कैंचांच्या फ्रेवर पॉलिकार्बोनेट शीटने आच्छादित करण्यात यावे, परंतु नाल्याचे सिमेंट क्राँक्रिटने आच्छादन करण्यास परवानगी नसेल, असे या धोरणात नमूद करण्यात आले आहे. नाल्यांची साफसफाई करण्याकरता कठोर तारांची जाळी असलेल्या झडपा तसेच नाल्यात उतरण्यासाठी लोखंडी शिडी बसवणे बंधनकारक आहे. प्रत्येक ३० मीटर अंतरावर या झडपा आणि शिडी असणंही यात नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक बीकेसीमध्ये? सीआरझेडचा फटका

विकासकाने ३ वर्ष देखभाल करावी…

महापालिकेने निश्चित केलेल्या नाल्यांची पूर्ण लांबी आच्छादित करणे विकासकाला बंधनकारक असेल. तसेच विकासकामार्फत आच्छादित करण्यात आलेल्या नाल्याची देखभाल किमान ३ वर्षे करणे विकासकाला बंधनकारक असेल. नाला आच्छादन करण्याकरता खासगी संस्था, विकासक तथा स्वयंसेवी संस्था यांना परवानगी दिल्यास त्या नाल्याचे आच्छादन आणि देखभाल हे संबंधित संस्थेमार्फत करण्यात येत असल्याचे फलक दर ५० मीटर अंतरावर लावले जावेत. परंतु त्यावर कोणतीही जाहिरात प्रदर्शित करता येणार नाही, असे या धोरणात म्हटले आहे.

झोपडपट्ट्यांलगतच्या नाल्यांवर लक्ष केंद्रीत

झोपडपट्टी वसाहतीमधून वाहणार्‍या नाले, गटारे यामध्ये वारंवार टाकण्यात येणारा कचरा अथवा टाकाऊ पदार्थ यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे झोपडपट्टी वसाहतींमधून तसेच शाळा, रुग्णालय, उद्यान यांच्या लगत वाहणार्‍या सहा मीटर रुंदीच्या नाल्यांचे आच्छादन या पॉलिकार्बोनेटद्वारे करण्यासाठी धोरण बनवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. नाले आच्छादित केल्यास नाल्यातील कचरा रोखता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -