घरमहाराष्ट्रसाईभक्तांसाठी खुशखबर; मुंबई-शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासात

साईभक्तांसाठी खुशखबर; मुंबई-शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासात

Subscribe

लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार, मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई ते शिर्डी दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याने मुंबईकरांना अवघ्या तीन तासात शिर्डीत दर्शनासाठी दाखल होता येणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे भक्तांचा वेळखाऊ आणि कंटाळवाणा प्रवास टळणार असून एकाच दिवसात साईबाबांचे दर्शन घेऊन मुंबईत परत जाण्याची सुविधा वाढणार आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शनासाठी देशभरातून गर्दी असते, मुंबई मधूननही शिर्डीला येणारा भक्त वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, मध्य रेल्वेच्या मुंबई ते शिर्डी दरम्यान रेल्वे मार्गावर अठरा रेल्वे गाड्या धावत आहे, यापैकी काही गाड्या दौंड-पुणे मार्गावरुन तर काही नाशिकरोड-मनमाड मार्गावरुन धावत आहेत, परंतु या गाड्यांना ९ ते १० तास लागतात. यामुळे मुंबई वरुन येणा-या भक्तांना किमान दोन दिवसांचा वेळ काढावा लागत आहे, यावर मध्य रेल्वे प्रशासनाने वंदे भारत रेल्वे यासाठी पर्याय म्हणुन निवडली असुन लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे समजते, सदर रेल्वे आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असुन सेमी हायस्पीड ट्रेन असुन ताशी १६० किलोमीटर वेग मर्यादा असल्याचे सांगितले जाते, वंदे भारत एक्सप्रेस मेट्रो ट्रेनच्या धर्तीवर असून या गाडीला १६ डब्बे आहेत त्यापैकी चौदा चेअर कार तर दोन डब्बे एक्जिक्युटीव आहे, रेल्वे गाडीत ११२८ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहे. भाविकांना मुंबई-शिर्डी-मुंबई असा प्रवास एका दिवसांत शक्य होणार असल्याने साई भक्तांच्या गर्दीतही वाढ होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -